देश-विदेशमहाराष्ट्रविशेषसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात विपश्यना केंद्र उभारणीसाठी सरकार सकारात्मकता दाखवेल- उपाध्यक्ष अण्णा बनसोडे.

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर परिसरातील 50 एकर जागा विपश्यना केंद्र उभारणीसाठी देण्याचा निर्णय सरकारने लवकर घ्यावा अशी मागणी प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्र भिक्खू संघाने केलीय. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी ही मागणी लावून धरण्याची मागणी भिक्खू संघाने केलीय. तर सरकार विपश्यना केंद्र उभारणीसाठी सकारात्मकता दाखवेल अशी ग्वाही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिलीय.
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील सुमारे 50 एकर जागेवर प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाच्या बौद्ध लेणी आहेत. धम्म-प्रचार-प्रसार धम्मसंस्कार विपश्यना शिबिरे, ध्यान वंदना तसेच विविध बौद्ध धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. या पवित्र स्थळी दरवर्षी विजया दशमी व बुद्ध जयंतीला महाराष्ट्रासह भारतभरातून तसेच परदेशातून 10 लाखाहून अधिक श्रद्धावान बौद्ध अनुयायी येतात.


स्थळाचे ऐतिहासिक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व ओळखुन ही 50 एकर जागा “विपश्यना केंद्र” म्हणून प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्रास कायमस्वरूपी वापरास देण्याची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी ही जागा देण्यास होकार दर्शवला असून पुढे सरकार याबाबत सकारात्मकता दाखवेल. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या जागेच्या मागणीसाठी पाठपुरवा करणार असल्याचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button