देश-विदेशमनोरंजनविशेषशहरसंपादकीय

सिकंदर,सलमान जिंकला चित्रपट हरला

मुंबई (हर्षदा वेदपाठक) – प्रकाश मेहरा यांच्या मुक्कदर का सिकंदर या चित्रपटामध्ये गीतकार अंजान यांनी लिहिलेले शीर्षक गीतं होते, साज ए गम पर जो खुशी के गीत गाता जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कहलाएगा.. सलमान खान चा सिकंदर हा चित्रपट, अंजान यांच्या याचं गीतावर आधारित असल्याचे दिसून येते. ॲनिमल मध्ये रणवीजयचे हार्ट ट्रान्स्प्लांट हा विषय होता. त्यासह ऊवरवरित फिल्म ही फक्त सलमान सभोवती फिरते. अंजान यांचा मुलगा समीर यांनी सिकंदरची गाणी लिहिली आहेत. चित्रपटाचे संगीतकार हे प्रीतम असून त्यातील एकही गाणं हे सिनेमागृहाच्या बाहेर पडल्यावर लक्षात राहत नाही.

सलमान खानचा चित्रपट कसाही असो, फर्स्ट डे फर्स्ट शो हा नेहमीच हाउसफुल राहायला आहे. त्यात जय हो, रेस 3, दबंग 3, टायगर 3 या चित्रपटांमध्ये फक्त सलमान असल्याने त्याच्या फॅन मंडळींनी त्या चित्रपटाला गर्दी केली होती. याच विचारसरणीने सिकंदर हा सलमानचा चित्रपट ईद आणि त्यातही रविवार या विशेष योगावर प्रदर्शित करण्यात आला आहे. परंतु भारतामध्ये आता ईद सोमवारी साजरी होणार आहे. त्यामुळे की काय रविवार असूनही, सिनेमागृह गुढीपाडव्यामुळे, रिकामी दिसून आलीत.

कथानकाचे म्हणाल तर दहा वर्षांपूर्वी आलेल्या, सुरज बडजात्या यांच्या प्रेम रतन धन पायो हा चित्रपट जिथे संपतो, तेथेच सिकंदरचे कथानक सुरू होते. सिकंदर मध्ये सलमान खान राजकोटचा महाराज आहे. देशातील पंचवीस टक्के सोन्याचा मालक आहे हा ताजा. तर एका कमी वयाच्या युतीला वाचवताना, तो तिच्याबरोबर लग्न करतो, परंतु कोणत्या घटनेमुळे तो त्या मुलीबरोबर लग्न करतो, ते दिग्दर्शक मुरगोदोस कोठेच स्पष्ट करत नाही.

बऱ्याच दृश्यांनमध्ये सलमान खानचा चेहरा ओळखला येतो. मात्र लॉन्ग शॉट, ॲक्शन आणि बॅक टू कॅमेरा दृश्यामध्ये तो सलमान खान आहे, असे वाटत नाही. इतकेच नव्हे तर रश्मिका मंदाना आणि सलमान खान मध्ये केमिस्ट्री सुद्धा गायब दिसते. ती राणी मेल्यावर तिचे अवयव तीन लोकांना दान केले जातात, हे दृश्य पाहताना, जय हो या चित्रपटची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्या चित्रपटात एक माणूस तीन चांगली कामे करतो. आणि त्यांना पुढे तीन वेगळ्या लोकांना मदत करायला सांगतो. आणि चांगल्या कामाची एक चेन बनेल, ज्याच्यामुळे समाज आणि देश प्रगती करेल हा एक चांगला संदेश होता. येथे देखील तशाच प्रकारे अवयवदान या विषयावर तो भाष्य करतो.

प्रतीक बब्बर एक खलनायक म्हणून तसेच राजकारणीचा मुलगा म्हणून फारसा जमत नाही. तर बाहुबली फेम सत्यप्रकाश सुद्धा राजकारणी म्हणून विशेष प्रभाव पाडत नाही.

ढासळलेलं कथानक विस्कटलेली पटकथा आणि संवाद यात सिकंदर हरवल्याचे दिसून येते.

सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात त्याचा अभिनय साधारणच असतो. तर त्याचा जास्त भर हा ॲक्शनवर दिलेला दिसतो. मैने प्यार किया, हम दिल दे चुके सनम, तेरे नाम, हम आपके है कौन या चित्रपटातील रोमँटिक भूमिकेमध्ये भावलेला सलमान सिकंदर म्हणून उपरा वाटतो.

गजनी, हॉलिडे, अकिरा या चित्रपटानंतर दिग्दर्शक मुरगादोस ने सिकंदर तयार केला खरा, मात्र त्यांच्या मागील चित्रपटाप्रमाणे त्यांची माध्यमातील पकड सैल होताना दिसतेव. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक नामचीन नाव सिकंदर मध्ये आहेत. मात्र त्यांच्याकडून यथायोग्य काम करून घेण्यात दिग्दर्शकाला आलेले अपयश स्पष्ट दिसते. ऍनिमल आणि छावा मध्ये रश्मिका छोट्या भूमिकेत भावली होती. परंतु इकडे कदाचित सलमान खान आहे म्हणून ठीक आहे. मात्र दोघांमध्ये केमिस्ट्री नसल्याने तिची भूमिका लक्षात राहत नाही.

ईद निमित्ताने रविवारी प्रदर्शित झालेला सिकंदर पाडवा सण साजरा करणाऱ्या, तसेच सोमवारी ईद साजरी करणाऱ्यांसाठी, सलमान खान असलेला चित्रपट एकदा तरी बघायला हरकत नाही. चित्रपट पाहताना मात्र जास्त अपेक्षा घेऊन सिकंदरच्या दर्शनाला जाऊ नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button