सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या भरीव कार्याबद्दलशिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांना डॉक्टरेट

मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि जनता दरबार च्या माध्यमातून समाजातील अनेक शोषित पीडित जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे नितीन नांदगावकर यांना फ्रान्स च्या “इकोल सुपरिअर रॉबर्ट डी सोर्बन” या संस्थेमार्फत डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. दिनांक 18 मार्च 2025 रोजी दिल्ली विमानतळाजवळील बाल-ला-मोंडे हॉटेलमध्ये हा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.
“सोर्बन इंटरनॅशनल सिलेक्शन कमिटी आणि ज्युरीने
तुमच्या जीवन कार्य अनुभव, कामगिरी, राष्ट्र आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाच्या आधारे तुमची ऑनोरिस काउसा पीएचडीची पुष्टी केली आहे.

परोपकार या विषयात पीएचडी केलेल्या तुमच्या विशेष कामगिरीबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. १८ मार्च २०२५ रोजी दिल्ली विमानतळाजवळील बाल-ला-मोंडे हॉटेलमध्ये भारतात होणाऱ्या दीक्षांत समारंभात तुम्हाला सन्मान प्रदान केला जाईल. संपूर्ण टीमच्या वतीने, मी पुन्हा एकदा तुमच्या कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन करतो! दीक्षांत समारंभासाठी तुमच्या उपस्थितीची वाट पाहत आहे. धन्यवाद“ असे इकोल सुपरिअर रॉबर्ट डी सोर्बन,फ्रान्स संस्थेचे उपाध्यक्ष आणि आयआयपीपीटी फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच सोर्बन इंटरनॅशनल सिलेक्शन बोर्ड दीक्षांत समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक चौधरी, डी. लिट यांनी अलीकडेच श्री नितीन नांदगावकर यांना आग्रहाचे निमंत्रण देऊन डॉक्टरेट स्वीकारण्याची विनंती केली आहे.

फ्रान्स च्या संस्थेने सोशल मीडिया विशेषतः फेसबुक आणि युट्युब वरील नितीन नांदगावकर यांचे जनता दरबार आणि इतर समाजकार्याचे व्हिडीओ पाहून त्यांना डॉक्टरेट देण्याचा निर्णय घेतला ही निश्चितच आनंदाची बाब आहे. नितीन नांदगावकर यांनी याबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे .