
गोवा : गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) जरीपिओ’ (Jaripeo) या माहितीपटाच्या विशेष स्क्रीनिंगदरम्यान प्रिव्ह्यू कमिटीच्या सदस्य हर्षदा गजानन वेदपाठक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात दरम्यान
‘जरीपिओ’ (Jaripeo) या माहितीपटाच्या विशेष स्क्रीनिंगदरम्यान आंतरराष्ट्रीय सिनेमा स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य पंकज सक्सेना यांच्या हस्ते प्रिव्ह्यू कमिटीच्या सदस्य हर्षदा गजानन वेदपाठक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.प्रिव्ह्यू कमिटीचे सदस्य अनिल बी., प्रसेनजीत घोष आणि त्रिदीप गोगोई यांचा देखील सत्कार करण्यात आला .

मेक्सिको, अमेरिका आणि फ्रान्स या देशांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेल्या ‘जरीपिओ’ या माहितीपटाचे दिग्दर्शन एफ्राईन मोजिका आणि रेबेका झ्वेग यांनी केले आहे. मेक्सिकोतील मिचोआकान प्रांतातील पेनजामिलो येथे दरवर्षी होणाऱ्या ख्रिसमस रोडिओच्या पार्श्वभूमीवर या माहितीपटाची कथा उलगडते.
https://www.facebook.com/share/p/1JzLuWHFvj
काऊबॉय संस्कृतीच्या आड दडलेल्या ओळखींचा वेध
पारंपरिक काऊबॉय संस्कृतीतील पुरुषप्रधान वातावरण आणि त्यामागे दडलेल्या समलैंगिक ओळखी, भावनिक संघर्ष, प्रेमाची ओढ आणि स्वतःचा स्वीकार करण्याचा प्रवास या माहितीपटातून मांडण्यात आला आहे. सुपर ८ चित्रणशैली, वैयक्तिक आठवणी आणि वास्तववादी दृश्यांच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी हा विषय प्रभावीपणे मांडला आहे.

जगभरातील विविध संस्कृती, सामाजिक वास्तव आणि मानवी भावविश्व पडद्यावर आणणाऱ्या इफ्फीमध्ये अशा वेगळ्या आशयाच्या चित्रपटांना स्थान मिळत आहे. याच महोत्सवातील ‘जरीपिओ’च्या स्क्रीनिंगदरम्यान हर्षदा वेदपाठक यांचा झालेला सन्मान हा या कार्यक्रमातील विशेष क्षण ठरला आहे.



