महाराष्ट्रसामाजिक

मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक अधीक्षक सुमित राठोड यांचे निधन; हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील सहायक अधीक्षक सुमित हरीदास राठोड (४५) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विरार येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

सुमित राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होते. २००८ मध्ये त्यांची माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात लिपिक पदावर नियुक्ती झाली होती. गेल्या १८ वर्षांपासून ते या विभागात कार्यरत होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी महासंचालनालयाच्या विविध शाखांमध्ये जबाबदारीने काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सहायक अधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली होती.

राठोड यांचे पार्थिव शनिवारी रात्री मुंबईहून यवतमाळ येथे नेण्यात आले. रविवारी सकाळी यवतमाळमधील आर्णी रोडवरील वडगाव येथील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अल्पवयात झालेल्या त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button