महाराष्ट्रविशेषशहरसंपादकीयसामाजिक

सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्वसन प्रकल्पातील संगणकीय सोडत यशस्वीरित्या पार पडली

मुंबई :- गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आर-९ भूखंडावरील पुनर्वसन प्रकल्पातील सुमारे १५ वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सभासदांचा संघर्ष आज अखेर संपुष्टात आला. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ६६३ पात्र सभासदांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे पुनर्वसन सदनिकांची सोडत यशस्वीरीत्या पार पडली.
गोरेगाव पश्चिम येथील सरदार वल्लभ भाई सभागृहात आयोजित सोडत कार्यक्रम मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोडत कार्यक्रमामध्ये ६६३ पात्र अधिकृत सभासदांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमधील दिल्या जाणार्याम पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीची विंग, इमारतीतील सदनिकेचा मजला RAT (Randomised Allotment of Tenement) या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना श्री बोरीकर यांनी सांगितले की म्हाडाची सदनिका वितरणाची संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत पारदर्शक असून व यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नसल्याचे स्पष्ट केले. म्हाडा एक शासकीय उपक्रम असल्याने शासनमान्य पद्धतीनुसारच सदनिकांचे वितरण करणे म्हाडास क्रमप्राप्त ठरते असेही त्यांनी संगितले.
प्रकल्पविषयी माहिती देताना श्री बोरीकर म्हणाले की संस्थेच्या मागणीनुसार गृहनिर्माण संस्थेमध्ये सौर ऊर्जेची यंत्रणा बसविण्याकरिता म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिली असून सादर बाबतचे नियोजन मंडळातर्फे सुरू आहे. त्याचबरोबर संस्थेतील व्यायामशाळेकरिता लागणारी उपकरणे देखील म्हाडातर्फे उपलब्ध करवून देण्यात येणार असल्याचे श्री बोरीकर यांनी यावेळी संगितले.


या प्रकल्पाला दिनांक १ एप्रिल, २०२५ रोजी भोगवटा प्रमाण पत्र प्राप्त झाले आहे. डीसीपीआर नुसार आवश्यक असलेल्या ४१२ वाहनतळांऐवजी एकूण ६८६ पार्किंग जागा प्रत्येक सदनिकेकरिता एक याप्रमाणे वाहन स्थळाचे नियोजन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
यावेळी श्री बोरीकर यांनी संगितले की लाभार्थ्यांनी त्यांच्या सदनिकेत प्रवेश केल्यानंतर एक वर्षाच्या कलावधीत कोणत्याही संरचनात्मक दुरूस्तीची गरज भासल्यास मंडळामार्फत कंत्राटदार विनामूल्य सेवा देतील असे नियोजन करण्यत आले आहे. तसेच घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया जरी सुरू करण्यात येत असली तरी, सर्व सभासदांना मे महिन्यापर्यंत भाडे देण्यात येणार आहे. म्हाडातर्फे पात्र सभासदांना जानेवारी २०१८ पासून आजतागायत रु १२९ कोटी भाडे स्वरुपात अदा करण्यात आले आहे.
सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर काही वेळातच सोडतीचा निकाल सभागृहाबाहेरील सुचना फलकांवर दर्शविण्यात आला तसेच सायंकाळी ६ वाजेनंतर तो म्हाडाच्या संकेतस्थळावर (mhada.gov.in) सर्वांसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सोडतीत यशस्वी ठरलेल्या सर्व ६६३ सभासदांना त्यांच्या सदनिकांचे ताबा पत्र व चाव्या सोमवार, दिनांक ७ एप्रिल २०२५ पासून वांद्रे येथील म्हाडा गृहनिर्माण भवनातील मुंबई मंडळ गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातून प्रदान करण्यात येणार आहेत. त्याकरिता सभासदांचे शासकीय ओळख पत्र जसे आधार कार्ड आवश्यक राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button