टाटा मुंबई मॅरेथॉनच्या २१व्या आवृत्तीसाठी ६५,५००हून अधिक धावपटूंकरिता काटेकोर तयारी

मुंबई, – जागतिक अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेस असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन (TMM) चे आयोजक प्रोकॅम इंटरनॅशनल यांनी रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली. यंदा विक्रमी ७०,१०० धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असून, त्यापैकी ६५,५००हून अधिक प्रत्यक्ष धावणारे आणि ४,६००हून अधिक व्हर्च्युअल रनमध्ये सहभागी होतील.
टीएमएम मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नवीन मार्गाची घोषणा करण्यात आली. तसेच यंदाचे नवे वैद्यकीय भागीदार सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल यांनी स्पर्धेच्या दिवशी असणाऱ्या वैद्यकीय सुविधांची सविस्तर माहिती दिली.
यंदा प्रथमच धावपटूंना मुंबई कोस्टल रोड आणि बांद्रा-वर्ली सी लिंक या मार्गावरून धावण्याचा अनुभव मिळणार आहे. यामुळे मुंबईचे सौंदर्य आणि ऊर्जा जगासमोर दिसणार आहे. #HarDilMumbai या संकल्पनेखाली ही मॅरेथॉन पुन्हा एकदा मुंबईकरांना एकत्र आणणार आहे.

मार्गाबाबत बोलताना ह्यू जोन्स, रेस डायरेक्टर – टाटा मुंबई मॅरेथॉन म्हणाले,
“टाटा मुंबई मॅरेथॉनचा मार्ग आता अधिक परिपूर्ण झाला आहे. शहराचे पर्वत आणि समुद्र यांना जोडणारा हा मार्ग धावपटूंना एक वेगळाच अनुभव देतो. कोस्टल रोडमुळे मोकळी हवा, सुंदर दृश्ये आणि नवा उत्साह मिळतो. हा मार्ग कठीण असला तरी तेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.”
प्रत्येक प्रकारानुसार धावपटूंची संख्या (प्रत्यक्ष + व्हर्च्युअल)
मॅरेथॉन: १४,१५५
हाफ मॅरेथॉन: १६,३६९
ओपन १० किमी रन: ८,७२९
ज्येष्ठ नागरिक रन: २,२१९
दिव्यांग धावपटू (CWD): १,१४०
ड्रीम रन: २७,४५३
आशियातील ही प्रतिष्ठित मॅरेथॉन ३,८९,५२४ अमेरिकन डॉलर्स इतक्या बक्षीस रकमेची असून, पुरुष व महिलांसाठी समान बक्षीस रक्कम दिली जाते. विविध वयोगटांतील अव्वल तीन हौशी धावपटूंनाही बक्षिसे दिली जाणार आहेत.
शर्यतीचे वेळापत्रक व सुरुवात–समारोप स्थळे
मॅरेथॉन (४२.१९५ किमी): सकाळी ५.०० – CSMT /
बॉम्बे जिमखाना
हाफ मॅरेथॉन व पोलिस कप (२१.०९७ किमी): सकाळी ५.०० – माहिम रेती बंदर / OCS चौकी
ओपन १० किमी: सकाळी ६.०० – CSMT / मेट्रो थिएटर
एलिट मॅरेथॉन: सकाळी ७.०० –
CSMT
दिव्यांग रन (१.६ किमी): सकाळी ७.०५ – CSMT
ज्येष्ठ नागरिक रन (४.२ किमी): सकाळी ७.२५ – CSMT / मेट्रो थिएटर
ड्रीम रन (५.९ किमी): सकाळी ८.१५ – CSMT / मेट्रो थिएटर
वैद्यकीय व्यवस्था – सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल
डॉ. तरंग गियानचंदानी, सीईओ, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल म्हणाले,
“मुंबई मॅरेथॉन ही शहराच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. प्रत्येक धावपटू सुरक्षित राहावा, यासाठी आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देत आहोत.”
डॉ. राहुल पंडित, मेडिकल डायरेक्टर म्हणाले,
“धावपटूंची सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. संपूर्ण मार्गावर जागतिक दर्जाची वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे.”
वैद्यकीय सुविधा:
मार्गावर १६ वैद्यकीय केंद्रे
३ वैद्यकीय बेस कॅम्प
६ मिनी मेडिकल कॅम्प
२५ ACLS रुग्णवाहिका
४५०हून अधिक वैद्यकीय कर्मचारी
रस्त्यावर व मैदानात सुविधा
बिसलेरी: १६ पाणी केंद्रे, २,१७,००० लिटर पाणी

FAST&UP: ९ ड्रिंक स्टेशन, २
जेल स्टेशन
स्निकर्स: ३ स्टेशन
रेड बुल: २ स्टेशन
३० केमिकल टॉयलेट्स
५ संत्री व मीठ केंद्रे
५ स्पंज कूलिंग स्टेशन
३ मिस्ट झोन
सुरक्षा व स्वयंसेवक
पोलीस: ३,७००+
सुरक्षा रक्षक: ९००+
स्वयंसेवक: ७,२५०+ (मुंबई डबेवाले व NCC सह)
मेट्रो व शटल सेवा
आक्वा लाईन मेट्रो द्वारे पहाटे विशेष सेवा देण्यात येणार असून, धावपटूंना प्रमुख स्टार्ट पॉइंटपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
पर्यावरणपूरक मॅरेथॉन
टाटा मुंबई मॅरेथॉन ही १००% कचरा व्यवस्थापित, झिरो-वेस्ट-टू-लँडफिल स्पर्धा आहे.
प्लास्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापर, सायकल इकॉनॉमी आणि हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
थेट प्रक्षेपण
स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स १ आणि सोनी स्पोर्ट्स १ HD वर सकाळी ६.३० पासून पाहता येईल.



