
मुंबई ( हर्षदा वेदपाठक ) – बॉलिवूड अभिनेता आणि समाजसेवेतून “रिअल हिरो” ठरलेले सोनू सूद यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या श्रद्धा आणि जीवनदर्शनाविषयी विचार मांडले. ते म्हणाले – “माझी सर्वात मोठी प्रेरणा गणपति बाप्पा आहेत. आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा बाप्पानेच मार्ग दाखवला. समाजाची सेवा करण्याची ताकद आणि हिम्मत मला त्यांच्याकडूनच मिळते.”

हर्षदा वेदपाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूद दरवर्षी गणेशोत्सव आपल्या घरी साध्या पण भक्तिभावाने साजरा करतात. यंदाचे हे त्यांच्या बाप्पाचे २८ व वर्ष आहे. बाप्पाची मूर्ती त्यांच्या घरी सध्या स्वरूपात विराजमान केली, त्याची विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यांचा ठाम विश्वास आहे की बाप्पा केवळ सुख-समृद्धीच देत नाहीत तर योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणाही देतात.

कोरोना काळात प्रवासी मजुरांना घरी पोहोचवण्यापासून ते रोजगार, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात मदत करण्यापर्यंत सोनू सूद यांनी केलेली सेवा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अध्याय ठरली. त्यामुळे लोक त्यांना “मसीहा” म्हणून संबोधतात.
सोनू सूद म्हणाले – “ही माझी नाही, बाप्पाचीच इच्छा आहे. मी फक्त त्यांचा एक माध्यम आहे. जेव्हा लोकांची मदत करतो, तेव्हा असं वाटतं की बाप्पा स्वतः माझ्या हातून सेवा घडवून घेत आहेत.”

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोनू सूद यांच्या घरी दर्शनाला आलेल्या चाहत्यांनी त्यांना “बाप्पाचा खरा भक्त” म्हटलं. सोशल मीडियावर #GanpatiBappaMorya आणि #RealHeroSonuSood हे हॅशटॅग्स ट्रेंड झाले. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनीही त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करताना, त्यांची भक्ति आणि मानवता या दोन्ही गोष्टी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं.
सोनू सूद यांचं आयुष्य हे सिद्ध करतं की, जर ईश्वरावर अढळ विश्वास आणि हृदयात मानवतेची भावना असेल तर कोणतंही कार्य अशक्य नाही. गणपती बाप्पाच्या भक्तीने त्यांना फक्त एक यशस्वी अभिनेता नाही तर समाजाचा खरा सेवक बनवलं आहे.



