मनोरंजनमहाराष्ट्रविशेष

जटाधारा’ चे मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई – सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या अभिनयाने सजलेला जटाधारा याची दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी हिंदी आणि तेलुगू या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना एका अनोख्या अनुभवासाठी सज्ज रहावे.

झी स्टुडिओ आणि प्रेरणा अरोराने चित्रपटाचे कॅरेक्टर पोस्टर आणि जबरदस्त टीझर रिलीज केल्या नंतर प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आता निर्मात्यांनी मोशन पोस्टरसह रिलीज डेट जाहीर करताच हा उत्साह आणखी वाढला आहे.

दैवी मंत्रांच्या निनादासह विश्वाच्या भव्य दृश्यांनी सजलेला हा मोशन पोस्टर रोमांचाने परिपूर्ण आहे. यात सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या बरोबर दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवि प्रकाश, नवीन नेनी, रोहित पाठक, झांसी, राजीव कनकाला, शुभलेखा सुब्बाकर यांसह इतर कलाकारांची दमदार उपस्थिती दिसते. हा चित्रपट चांगले वाईट, उजेड आणि अंधार, मानवी इच्छा आणि विश्व नियती यांच्यातील भव्य संघर्षाचे प्रतीक आहे.

झी स्टुडिओचे सीईओ उमेश कुमार बंसल सांगतात, “झी स्टुडिओ जटाधाराला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. हा फक्त एक चित्रपट नाही तर एक अनुभव आहे जो अनुभव, कथा आणि दृष्टिकोन यांना नव्या उंचीवर नेईल. आमच्या भागीदार एस के जी एंटरप्रायझेस सोबत आम्हाला खात्री आहे की, सुधीर बाबू, सोनाक्षी सिन्हा आणि संपूर्ण टीम प्रेक्षकांना अशी दुनिया दाखवेल, जशी त्यांनी यापूर्वी कधीही पाहिली नसेल.”

प्रेझेंटर आणि निर्माती प्रेरणा अरोराने सांगितले, “रुस्तमच्या यशानंतर मी झी स्टुडिओ सोबत आणखी एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे, याचा मला अभिमान आणि कृतज्ञता वाटते. ही कथा आमच्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेली असून जागतिक सिनेमॅटिक दृष्टिकोनातून तयार केली आहे. आम्ही प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देणार आहोत जो भावनिक आणि दृश्यात्मकदृष्ट्या अविस्मरणीय असेल.”

दिग्दर्शक अभिषेक जैसवाल आणि वेंकट कल्याण म्हणाले, “जटाधारा ही लोक कथेवर आधारित आहे, जिथे अंधार दैवी शक्तीशी टक्कर घेतो आणि प्रेक्षकांना ईश्वराच्या उपस्थितीचा अनुभव देतो. ही श्रद्धा, भीती आणि विश्व नियती यांची कथा आहे.”

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि प्रेरणा अरोराने उमेश कुमार बंसल, शिविन नारंग, अरुणा अग्रवाल, प्रेरणा अरोरा, शिल्पा सिंघल आणि निखिल नंदा यांच्या सहकार्याने केली आहे. अक्षय केजरीवाल आणि कुस्सुम अरोरा हे को-प्रोड्युसर आहेत. दिव्या विजय क्रिएटिव प्रोड्युसर आणि भाविनी गोस्वामी सुपरवायझिंग प्रोड्युसर आहेत. चित्रपटाचा दमदार साउंडस्केप झी म्युझिक कंपनीने तयार केला आहे.
…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button