देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेष
Trending

शिक्षक दिन विशेष : रुपेरी पडद्यावर झळकलेले शिक्षक

मुंबई – शिक्षक आपल्या आयुष्याला दिशा, पिढ्यानपिढ्या प्रेरणा देतात आणि असे धडे शिकवून जातात, जे वर्गाच्या, भिंतीपलीकडे जाऊन आपल्याला आयुष्यात पुढे नेतात. रुपेरी पडद्यावरही अनेक कलाकारांनी अशा शिक्षकांची भूमिका साकारलीय ज्या खूप प्रेरणादायी ठरल्या आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पाहूया काही संस्मरणीय व्यक्तिरेखा

विद्या बालन – ‘शकुंतला देवी’
विद्या बालनने शकुंतला देवी (2020) मध्ये गणिताची जादूगारच नव्हे, तर कठीण गणिती संकल्पना सहज व रोचक बनवणारी शिक्षिका म्हणून भूमिका साकारली होती. जी वास्तवदर्शी व्यक्तिरेखेवर आधारित होती.

अमिताभ बच्चन – ‘ब्लॅक’
ब्लॅक या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी देबराज सहाय या शिक्षकाची व्यक्तिरेखा उभी केली, जे एका बहिर्‍या व अंध विद्यार्थिनीला ज्ञानाचा मार्ग दाखवतात. कठोर शिस्त आणि कोमल संवेदना यांच्या मिश्रणाने त्यांची भूमिका आयकॉनिक ठरली

शाहरुख खान – ‘मोहब्बतें’
मोहब्बतें मध्ये शाहरुख खान यांनी संगीत शिक्षक राज आर्यन मल्होत्राची भूमिका साकारली होती. प्रेम आणि अभिव्यक्तीचा धडा देत त्यांनी कठोर परंपरेला आव्हान दिले होते. शाहरुखने शिक्षकाच्या भूमिकेत भावनिक व कूल भूमिका साकारली होती.

आमिर खान – ‘तारे जमीन पर’
राम शंकर निकुंभ म्हणून आमिर खान यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाला समजून घेणारा, त्याच्या गुणांना पोषक वातावरण देणारा शिक्षक साकारला होता. त्यांची ही व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी मानली जाते.

राणी मुखर्जी – ‘हिचकी’
हिचकी मध्ये राणी मुखर्जीने टॉरेट सिंड्रोम असतानाही हार न मानणाऱ्या नैना माथुरची भूमिका केली. त्यांच्या संघर्षाने व दृढ निश्चयाने विद्यार्थ्यांनाही प्रेरणा दिली.

सुष्मिता सेन – ‘मैं हूँ ना’
रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका चांदनी म्हणून सुष्मिता सेन यांनी दाखवले की शिक्षक स्टायलिश, संवेदनशील आणि आकर्षकही असू शकतात.

नुसरत भरुचा – ‘छलांग’
छलांग (2020) मध्ये नुसरत भरुचाने कम्प्युटर शिक्षिका नीलिमेची व्यक्तिरेखा साकारली, जी विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच करत नाही तर करिअरविषयी गंभीर होण्याची प्रेरणा देते.

बोमन इराणी – ‘3 इडियट्स’
बोमन इराणी यांनी 3 इडियट्स मध्ये प्रो. वीरु सहस्त्रबुद्धी (वायरस) साकारला होता. कठोर शिस्तीचा आणि परंपरागत पद्धतीचा शिक्षक म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे.

या सर्व भूमिका सिद्ध करतात की रुपेरी पडद्यावरील शिक्षकही आपल्या खऱ्या आयुष्यातील गुरुजनांप्रमाणेच प्रेरणादायी ठरू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button