देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहर
Trending

मिफ’ (MIFF) ही आता सर्जनशील उत्कृष्टतेचा उत्सव साजरी करणारी एक जागतिक चळवळ बनली, क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड’ यातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई – जाते, असे ते म्हणाले. लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन ही, जगातील वास्तवापासून दूर पळणारी माध्यमे नाहीत, त्याऊलट ही माध्यमे एखाद्या आरशाप्रमाणेच त्या त्या वास्तवाचा प्रभाव प्रेक्षकांसमोर मांडतात, असे प्रतिपादन मगदूम यांनी केले.

ते पुढे म्हणाले, मिफ्फ 2026 ला जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या महोत्सवासाठी विविध देशांमधून 1,459 चित्रपटांचे अर्ज आले होते. या महोत्सवातील स्पर्धा विभागात 13 देशांमधील चित्रपटकर्मींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 144 चित्रपटांचा समावेश होता. यांपैकी 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय चित्रपटांच्या प्रवेशिका होत्या अशी माहिती त्यांनी दिली. बिगर स्पर्धा विभागात एकूण 202 चित्रपटांचे खेळ दाखवले गेले. याअंतर्गत 46 सहभागी देशांमधील 106 आंतरराष्ट्रीय आणि 96 राष्ट्रीय चित्रपटांचा समावेश होता. या महोत्सवादरम्यान एकंदरीत 83 तासांपेक्षा जास्त कालावधीचे स्क्रिनिंग केले गेले अशी माहितीही त्यांनी दिली. मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रेमंड क्रुम रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट तसेच मराठी चित्रपट, इफ्फी क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो, या आणि अशा 24 विशेष विभागांतर्गत निवडक चित्रपटांच्या खेळांची सत्रे आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून नावाजलेल्या कलाकृती, नवीन उदयोन्मुख प्रतिभा आणि प्रादेशिकत्वाच्या मूळांशी रुजलेली कथात्मक मांडणी एकाच व्यासपीठावर पाहण्याचा अनुभव आला असे त्यांनी सांगितले. सेंटिनरी ट्रिब्यूट अर्थात शताब्दी आदरांजली या विशेष विभागाअंतर्गत  दिग्गज चित्रपटकर्मी डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या दोन चित्रपटांचे खेळ दाखवून, त्यांच्या प्रतिभेचा गौरव केला गेला, असे त्यांनी म्हटले.

19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ) समारोप होत असताना, कथाकथन, सर्जनशीलता आणि सिनेमॅटिक उत्कृष्टतेची भावना चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांना समान रितीने प्रेरित करत आहे. जर चित्रपट हे आत्म्यासाठी एखाद्या अन्नपदार्थाप्रमाणे असतील, तर ‘मिफ’ने पुन्हा एकदा सशक्त कथा, विविध दृष्टिकोन आणि परिवर्तनशील विचारांनी मनाचे पोषण केले आहे. हा अध्याय इथे संपत असला तरी, अर्थपूर्ण सिनेमाचा उत्सव साजरा करण्याचा प्रवास असाच सुरू राहील. चित्रपटप्रेमी आता 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी – IFFI) तसेच 2028 मध्ये होणाऱ्या ‘मिफ’च्या आगामी आवृत्तीची आतुरतेने वाट पाहतील, जेव्हा जगभरातील कथाकारांचे स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा पडदा उघडेल आणि जोडण्याची, प्रेरित करण्याची तसेच चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्याची चित्रपटांची अफाट शक्ती पुन्हा एकदा अधोरेखित होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button