महाराष्ट्रशहर

दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई.

मुंबई – राज्‍य सरकारने महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिल्‍यामुळे एसटी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीत एसटी महामंडळाने विक्रमी कमाई केली आहे. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली आहे. एका दिवसात राज्यात एसटीने 37 कोटी 63  लाख रुपयांची कमाई झाली. एसटीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एक दिवसात मिळवलेल्या उत्पन्नापैकी हे सर्वाधिक उत्पन्न आहे. विशेष म्हणजे गर्दीचे आणि  उत्पन्नाचे अनेक विक्रमही एसटीने मोडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button