मनोरंजनमहाराष्ट्रविशेष

तेरी बातों में ऐसा उलझा जिया – प्रेक्षकही उलझले

हर्षदा वेदपाठक

मुंबई – ऐ.आय.च्या आविष्काराने जेथे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिकडेच हा ऐ.आय. कुटुंबाचा एक सदस्य म्हणून जर घरात घुसला किंवा एखादी व्यक्ती त्याच्या प्रेमात पडली तर काय घडेल, या संभाव्य विषयाला घेऊन अमित जोशी आणि आराधना साह यांनी, तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट तयार केला आहे.

अमेरिकन टीव्ही सिरीयल स्मॉल वंडर या मालिकेमध्ये एक इंजिनियर बाल रॉबर्ट तयार करतो आणि त्यानंतर काय काय गमती जमती घडतात त्याचे कथानक त्या फॅमिली ड्रामा असलेल्या मालिकेमध्ये पाहायला मिळते. असंच काहीसं तेरी बातों में ऐसा उलझा जिया मध्ये घडते. रॉबर्ट नसल्याचे माहित असल्याने, कम्प्युटर इंजिनियर असलेला तरुण सुंदर असलेल्या रॉबर्ट च्या प्रेमात पडतो. आणि जेव्हा त्या तरुणाला समझून येते की आपण ज्या मुलीच्या प्रेमात पडलो आहे, ती खरी मुलगी नसून रॉबर्ट आहे. किती झालं तरी मानवीय भावना, विचार आणि वागणूक हि त्या आर्टिफिशियल इंटेलिजंट असलेल्या रॉबर्ट मध्ये कधीच येणार नाही. तिकडे फक्त मानवी भावना असलेल्या व्यक्तीचीच गरज असणार आहे आणि या विचारानंतर त्या तरुणाच्या जीवनामध्ये वेगळा रंग येतो त्याचे चित्रण आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजंट हि संकल्पना लाईफ पार्टनरच्या दर्जापर्यंत पोहोचेल का, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली व्यक्ती एखाद्या तरुण किंवा तरुणीची जोडीदार होऊ शकते का हा विचार, तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट मांडतो. मात्र अशक्त पटकथा, रटाळ कथानक आणि प्रसंग यामध्ये चित्रपट बराच रेंगाळत जातो, तसेच फार प्रेडिक्टेबल होऊन बसतो.

कमीने, हैदर या चित्रपटानंतर फर्जी या वेब सिरीज मध्ये दिसलेला शाहिद कपूर, आर्यन म्हणून तेरी बातों में ऐसा उलझा जिया मध्ये आपल्याला काही प्रमाणात गुंतवून ठेवतो. मात्र सिफ्रा म्हणून क्रिती सोनन जो काही ठोकळेबाजपणा देते तो जमून जातो. कारण त्या भूमिकेसाठी अभिन्याची फारशी गरज नाही. राष्ट्रीय पारितोषिक विजेती क्रीती सनोन, हिला आदीपुरुष आणि गणपत या दोन चित्रपटाने फारसा हात दिला नाही. येथे सुद्धा रॉबर्ट म्हणून ती प्रयत्न करताना दिसते खरी. परंतु अभिनेत्री नव्हे तर मॉडेल या बिरुदापेक्षा ती पुढे जात नाही.

तेरी बातों में ऐसा उलझा जिया, या चित्रपटाचे संगीत आणि शाहीदचे नृत्यचापल्य वाखाणण्याजोगे आहे. तरुणांसाठी घेतलेल्या विषयासाठी, तरुणांना आवडेल अशाच प्रकारचे संगीत घेतलेले आहे. इतर बाबतीत बोलायचे झाले तर, संकलन, निर्मिती मूल्य अतिशय उत्तम आहेत. मुळात कमकुवत आणि प्रेडिक्टेबल असलेल्या या सहकलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. विशेष करून डिंपल कपाडिया यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विशेषयोग्य शास्त्रज्ञ म्हणून घेतलेली मेहनत लक्षात राहते.

तेरी बातों में ऐसा उलझा जिया मध्ये, उलझण्यासारखं काहीच नाही. कमकुवत पटकथा, साधारण संवाद, लक्षात न राहण्याजोगा अभिनय या सगळ्यांचे मिश्रण येथे दिसून येते. तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटाच्या शेवटी एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. इतकंच नव्हे तर चित्रपटाचा भाग दोन येण्याची संभावना देखील येथे दिसून येते. तोपर्यंत भाग एकचा झटका हळूच घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button