महाराष्ट्रविशेषशहर

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपल्या गोल्डन तिकीट धारकांना देणार सचिन तेंडुलकर यांची स्वाक्षरी कोरलेल्या बॅटची संस्मरणीय भेट

मुंबई
भारतातील आघाडीची, स्टेडियममध्ये खेळली जाणारी, टेनिस बॉल टी१० क्रिकेट टूर्नामेंट, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) आपल्या गोल्डन तिकीट धारकांना महान क्रिकेटर आणि भारत रत्न सचिन तेंडुलकर यांची स्वाक्षरी कोरलेल्या बॅट भेट म्हणून देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करणार आहे. यासंदर्भात शेयर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टरने स्वतः सांगितले आहे की भाग्यवान गोल्डन तिकीट धारकांना आयएसपीएल त्यांची ऑटोग्राफ असलेली बॅट भेट म्हणून देणार आहे. प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकते, हा लीगचा विश्वास दर्शवण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे.


पहिल्या आयएसपीएलमध्ये हैद्राबाद, मुंबई, बंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगर (जम्मू व काश्मीर) हे सहा संघ आपली क्रीडा कौशल्ये प्रदर्शित करतील. ६ मार्च ते १५ मार्च २०२४ पर्यंत मुंबई शहर या लीगच्या आधुनिक क्रिकेट मनोरंजनाचे केंद्र बनेल, दर दिवशी संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सामान्यांचा थरार अनुभवता येईल.
आयएसपीएल क्रीडा मनोरंजनात एक क्रांती घडवून आणेल. मैदानावर रोमांचक क्रिकेटबरोबरीनेच ही लीग आपल्या दर्शकांसाठी म्युझिकल फेस्टिवलचे देखील आयोजन करेल, यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकार भाग घेतील. लाईव्ह परफॉर्मन्सेस, मंत्रमुग्ध करणारे ड्रोन शो, लेजर डिस्प्ले आणि शानदार डीजे चेतस यांची नवी गाणी यातून क्रिकेट आणि मनोरंजनाचा उत्तम मिलाप सादर केला जाईल.
आयएसपीएल कोर कमिटीचे सदस्य श्री सचिन तेंडुलकर यांनी सांगितले, “स्वप्नेच यशाचा मार्ग दाखवतात, प्रत्येक गुणी क्रिकेटरला कौतुक आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे. क्रिकेटवर अतीव प्रेम करणाऱ्या गोल्डन तिकीट धारकांना प्रेरित करण्यासाठी चालवल्या जात असलेल्या आयएसपीएलच्या या उपक्रमात योगदान देऊन मला अतिशय आनंद होत आहे. ही बॅट प्रोत्साहनाचे प्रतीक आहे, ही बॅट त्यांना मेहनत व समर्पणाची आठवण करून देत राहील, ही बॅट कायम सांगत राहील की, मनापासून इच्छा असेल आणि मेहनत केली तर सर्व काही संभव आहे.”

https://www.instagram.com/p/C3fK_s4I8lS/


आयएसपीएल कोर कमिटीचे सदस्य श्री आशिष शेलार म्हणाले, “आयएसपीएल एक असा समुदाय आहे जो प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्यात आणि अढळ निष्ठेचे पालन करण्याच्या संस्कृतीवर विश्वास ठेवतो. आमच्या गोल्डन तिकीट धारकांचे क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि उत्साह यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम चालवला जात आहे. सचिन तेंडुलकर जी यांची आयकॉनिक ऑटोग्राफ कोरलेल्या बॅट म्हणजे प्रेरणा आणि प्रोत्साहनाचा संदेश आहेत.”
आयएसपीएल कोर कमिटीचे सदस्य श्री अमोल काळे यांनी सांगितले, “आयएसपीएलमध्ये आम्ही महत्त्व देतो स्वप्नांमधील शक्तीला. गोल्डन तिकीट हे समर्पण आणि मेहनतीचे प्रतीक आहे. सचिन तेंडुलकर जी यांची आयकॉनिक ऑटोग्राफ कोरलेली बॅट आमच्या गोल्डन तिकीट धारकांना देऊन आम्ही त्यांना मर्यादांच्या पलीकडे जाऊन लक्ष्य प्राप्त करण्याची प्रेरणा देत आहोत.”


आयएसपीएलचे कमिशनर श्री सुरज समत यांनी सांगितले, “स्वाक्षरी कोरलेली बॅट आमच्या समर्थकांमध्ये समुदायिकतेच्या आणि सक्षमतेच्या भावनेला प्रोत्साहन देईल. माननीय सचिन तेंडुलकर जी यांच्या सहयोगाने या उपक्रमाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे की या बॅट आमच्या गोल्डन तिकीट धारकांसाठी उत्कृष्टतेच्या दिशेने पुढे जात राहण्यासाठी प्रेरणेचा स्रोत बनतील.”

आयएसपीएल बॅट मिळवण्यासाठी
• ispl-t10.com वर जा.
• आपले रजिस्ट्रेशन क्रिडेन्शियल्स भरून प्लेयर अकाउंटमध्ये लॉगइन करा.
• आपला पत्ता अपडेट करा.
• आयएसपीएल एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी संपर्क साधून बॅट डिलिव्हर करतील.

आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा.
https://twitter.com/ispl_t10
https://www.youtube.com/@ispl_t10
https://www.facebook.com/ispl.t10
https://www.instagram.com/ispl_t10/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button