देश-विदेशमनोरंजनविशेषशहर

माशा अँड द बेअर मुंबई मध्ये पुन्हा LIVE

मुंबई प्रतिनिधी –

जर तुमची लहान मुले असतील किंवा जवळपास असतील तर तुम्ही माशा आणि दि बेअर विषयी नक्कीच ऐकले असेल. जर तुम्ही शोचा नाट्यमय आविष्कार पहात असाल, तर तुम्हाला त्यांनी जीवनात आणलेली जादू माहिती असे, पण जर हे नसेल तर तुमचे नशी चांगले आहे. अनोखा असा मनोरंजनात्मक अनुभव तुम्हाला आता एका स्पिरिटेड गर्ल माशा आणि तिचा मित्र असलेल्या दि बेअर कडून मिळणार आहे. या दोघांनी भारतात डिसेंबर मध्ये पदार्पण केले आणि आता मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आता हे शोज मुंबईत तिसर्‍यांदा पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे.‍ Nick Jr.’s हा शो व्हायकॉम १८ लाईव्ह द्वारे संकल्पित आणि निर्मित असून आता तो मुंबईत पुन्हा एकदा ८ आणि ९ जून रोजी बालगंधर्व रंगमंदीर, बांद्रा येथे सादर केला जाणार आहे. त्यानंतर हाच कार्यक्रम बंगलोर येथील आंबेडकर भवन, मिलर रोड येथे २९ आणि ३० जून रोजी सादर करण्यात येणार आहे.

या शो ने भारतात खूपच प्रसिध्दी मिळवली आहे. पालक आणि त्यांच्या मुलांसह सोहा अली खान, समीरा रेड्डी, काजल अगरवाल, मंदिरा बेदी, नेहा धुपिया, नित्या मेहरा आणि श्रीया सरण यांसारख्या अनेक सेलिब्रिटीज नी सुध्दा या कार्यक्रमाचे कौतूक केले आहे.

सोहा अली खान म्हणते “ मला हा शो खूपच आवडला. आम्ही माशा ॲन्ड दि बेअर प्रथम टेलिव्हिजनवर पाहिली आणि तो आता लाईव्ह होतोय ही आनंदाची बाब आहे. मला वाटते की तुमच्या मुलांचे बंध सक्षम करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि जर तुम्हाला नॉन डिजिटल आणि नॉन स्क्रीनशी संबंधित असाल तर तुमच्या मुलांबरोबर हा कार्यक्रम पाहण्याचा अनोखा आनंद आहे आणि तो ही माशा ॲन्ड दि बेअर चा कार्यक्रम एक आनंदाची पर्वणी असेल.”

नेहा धुपिया म्हणते “ खरे पाहता दीड तासासाठी मुलांकडे लक्ष देऊ शकते, या व्यतिरिक्त एका आईला आणखी काय हवं? खूपच मनोरंजक, सुयोग्य संयोजन आणि चांगले काम करुन जीवनाचे धडे व मैत्री आपल्याला यातून प्राप्त होते.”

श्रीया सरण म्हणते “ माशा ॲन्ड दि बेअर मधील मला सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे ती आपल्याशी जोडली जाते. एक सुंदर लार्जर दॅन लाईफ भुमिका आपल्याजवळ येते आणि संपूर्ण स्टोअरीतून आपल्याला मैत्री आणि प्रेमा साठी विशेष गोष्ट दर्शवते. माझा पती रशियन आहे आणि तो सुध्दा माशा ॲन्ड दि बेअर चा चाहता आहे. मी माझ्या मुलीला स्क्रीन टाईम पासून दूर करण्यासाठी अशा शोज ना आणते, यामुळे तिला अशा पात्रांची माहिती मिळते विशेषकरुन राधाचा हा पहिला थिएटर शो आहे, ती थिएटर मध्ये खूप वेळ बसून असे पण तिचे काम सुध्दा सुंदर आहे. तिला ते आवडले, ती खूष झाली, तिने टाळ्या वाजवल्या आणि ती नाचली सुध्दा, म्हणूनच हा एक अविस्मरणीय क्षण असेल.”

हे कथानक खूपच संदर आहे, आकर्षक पात्रे आणि दूरगामी संदेश या गोष्टी भारतीय घरांतील Nick Jr.’s महत्त्वपूर्ण गोष्टी ठरल्या आहेत. संगीत, नृत्य आणि चांगला संदेश यांनी युक्त ‘अ व्हेरी डिटेक्टिव्ह स्टोरी’ ही सर्व वयोगटांतील मुलांसाठी योग्य आहे ज्यामुळे शो प्रेक्षकांना अनोखा अनुभव देऊन माशा ॲन्ड दि बेअर प्रेक्षकांना एकत्र कोडे सोडवण्याची संधी देतात. अगदी उत्तरे शोधण्यापासून नृत्या पर्यंत माशा, दि बेअर, प्रोफेसर नॉनबिलिव्हियस, रोझी, दि पांडा, स्लाय फॉक्स आणि सिली फॉक्स ही सर्वच पात्रे मुलांची मने कशी जिंकतात ते पाहता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button