राज्यातील प्रथम शासकीय स्तरावरील “संविधान व्याख्यानाला उद्यापासून सुरवात

नाशिक (प्रतिनिधी ) – 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.”संविधान दिनाचे “औचित्य साधून संविधान व्याख्याते तुषार पगारे यांच्या माध्यमातून संविधान व्याख्यान तथा जनजागृती अभियान कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे महाराष्ट्र शासन नियुक्त संविधान व्याख्याते तुषार पगारे यांचे दुपारी 12:00 ते दुपारी 1:30 पर्यंत संपन्न होणार आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे एलीफिस्टन आय. टी आय येथे भारताचे महामंहीम उप राष्ट्रपती धनकडं यांचे हस्ते “संविधान मंदिराचे “उदघाटन झाले..कौशल्य, विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सूचनेनुसार श्री. तुषार पगारे यांनी राज्यतील 13 शासकीय औ. प्र. संस्था मध्ये “संविधान व्याख्यान तथा जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला. याची दखल घेऊन या विभागातर्फे तुषार पगारे सर यांची संविधान व्याख्याते म्हणून नियुक्ती झाली असून उद्या राज्यातील प्रथम शासकीय स्तरावरील “संविधान व्याख्यान तथा जनजागृती अभियान कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे संपन्न होत आहे.

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय संविधान दिवस राष्ट्रीय कायदा दिवस आणि भारतीय संविधान दिवस म्हणून देखील ओळखला जातो.
देशाच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी वर्तमान संविधान औपचारिकपणे स्वीकारले. तथापि, स्वीकृतीनंतर दोन महिन्यांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधान दिन का साजरा केला जातो
संवैधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सामाजिक न्याय मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक मूल्यांचे ज्ञान व्हावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना शिकवली जाते
https://webcast.gov.in/events/MjQ2Ng–/session/NTY1OQ–?jwsource=cl



