देश-विदेशमनोरंजनविशेष

फिल्म बाजार 2024: सिनेमॅटिक उत्कृष्टता आणि जागतिक व्यावसायिक सहकार्याच्या उत्सवाचा 55 व्या इफ्फीमध्य् झाला समारोप

गोवा (पणजी ) विशेष प्रतिनिधी –

  • फ्लेम्स

रोख पारितोषिकासोबतच, विजेत्यांना अनेक अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. यामध्ये देशातील 300 क्यूयुबीई चित्रपट गृहांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या मूल्याच्या ट्रेलर जाहिराती,तसेच त्यांचे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत म्हणून जाहिरात विषयक इतर संधी यांचा समावेश आहे.

विद्यार्थी निर्माता कार्यशाळा पिच पारितोषिकाचा विजेता ठरला अनुश्री केलात हिचा ‘डेडली डोसाज’ तर पुंजल जैन हिचा ‘लकडहारा’ उपविजेता ठरला.

फिल्म बाजार या उपक्रमात प्रथमच चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल कॉ-प्रोडक्शन फीचर कॅश ग्रांट्स श्रेणीतील पारितोषिकाची सुरुवात करण्यात आली.

  • या विभागातील प्रथम बक्षीस पायल सेठी दिग्दर्शित आणि थानिकेचलम एस.ए. निर्मित कुरींजी (द डिसअॅपियरिंग फ्लॉवर) या चित्रपटाला देण्यात आले.
  • दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचा विजेता ठरला संजू सुरेन्द्रन दिग्दर्शित आणि प्रमोद सानकर निर्मित कोठीयन- फिशर्स ऑफ मेन
  • प्रांजल दुआ यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि बिच-क्वान ट्रान यांनी निर्मिलेल्या टेन हेड्सऑफ रावण या चित्रपटाला या विभागातील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

याशिवाय, सुमित पुरोहित दिग्दर्शित आणि चिप्पी बाबू तसेच अभिषेक शर्मा यांच्यातर्फे निर्मित बागी बेचारे या चित्रपटाला स्पेशल मेन्शन फॉर बेस्ट पिच मानांकन देण्यात आले.

एका विशेष उपक्रमाअंतर्गत, फिल्म बाजारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात फ्रेंच प्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचा देखील सत्कार करण्यात आला. 

फिल्म बाजारच्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवणाऱ्या वेव्हज 2025 च्या टीझर च्या सादरीकरणासह या सायंकालीन कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे संयुक्त सचिव तसेच एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रीथूल कुमार तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागातील चित्रपट विभागाच्या संयुक्त सचिव वृंदा मनोहर देसाई यांची भाषणे झाली. या प्रसंगी, फिल्म बाजार चे सल्लागार जेरोम पैलार्ड,सुप्रसिध्द अभिनेता अविनाश तिवरी आणि प्रख्यात कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा देखील उपस्थित होते.

फिल्म बाजार 2025 साठीचा मंच तयार करत या कार्यक्रमाने कथाकथन आणि नवोन्मेष यांच्या जागतिक केंद्राच्या रूपातील वारशाला दुजोरा दिला. पुढच्या वर्षीसाठीच्या कार्यक्रमाची उत्सुकता निर्माण होत असतानाच, पुढील वर्षीचा कार्यक्रम अभूतपूर्व यश आणि चैतन्यमाय चित्रपटीय सहयोगांचे आणखी एक वर्ष साजरे करण्याचे वचन देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button