मनोरंजनमहाराष्ट्रविशेष

आपले सरकार मातीला नमन करणारे – आशिष शेलार

मुंबई,
आपले सरकार इथल्या मातीला नमन करणारे आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या
सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचनालय यांच्या तर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने माटूंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात “अमृतातेही पैजा जिंके” या विशेष कार्यक्रमात मराठी भाषेतील कविता, नाट्यगीत आणि गीतांंसह विविध बोली भाषांमधील विविध अविष्कार यावेळी सादर करण्यात आले. मराठी रसिकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर,अभिनेत्री मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री, मंदार आपटे, माधुरी करमकर, धनंजय म्हसकर आदी कलाकरांचा यामध्ये सहभाग होता. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील मोने, सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button