लीपनंतर नव्या झनकच्या व्यक्तिरेखेविषयी सांगतेय अभिनेत्री रिया शर्मा

मुंबई – ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘झनक’ २० वर्षांचा काळाचा टप्पा ओलांडत, एक धाडसी झेप घेत, एका शक्तिशाली नव्या अध्यायात प्रवेश करत आहे. नव्याने प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या प्रोमोमध्ये नव्या पिढीची झलक दिसते. या प्रोमोत एका मोठ्या झालेल्या झनकची ओळख प्रेक्षकांना होते, जी उत्साही आहे, निर्भय आहे आणि जगाला सामोरे जाण्यास सज्ज आहे.

या नव्या टप्प्याबद्दल तिचे विचार मांडताना, झनक ऊर्फ झनकची भूमिका निभावणारी अभिनेत्री रिया शर्मा हिने सांगितले, “नव्याने प्रदर्शित झालेल्या प्रोमोत झनकच्या आयुष्यातील एक अतिशय वेगळा टप्पा प्रेक्षकांना दिसेल, मालिकेच्या नव्या टप्प्यात २० वर्षांचा पल्ला ओलांडण्यात आला असून या मालिकेने एक धाडसी झेप घेतली आहे, ज्यात प्रेक्षकांना झनकची मुलगी दिसेल, तिलाही ‘झनक’ असेच संबोधले जाते. ती तरुण आहे, धाडसी आहे, स्पष्टवक्ती आहे आणि तिच्या मूल्यांनुसार ठाम भूमिका घेणारी आहे. झनक (मुलगी) मूर्खपणा सहन करत नाही आणि तरीही ती भावनांचा व नातेसंबंधांचा मनापासून आदर राखते.”
रियाने नमूद केले, “२० वर्षांचा काळाचा टप्पा ओलांडल्यामुळे, प्रेक्षकांना नव्या भागांमध्ये एक अशी झनक दिसेल जी निर्भय आहे, जिला स्वत:ची मते आहेत आणि जे योग्य आहे त्याकरता लढण्याची वेळ येते, तेव्हा ती कधीही गप्प बसत नाही. मला तिची ऊर्जा आणि आत्मविश्वास भावतो. ती आपल्या भावना व्यक्त करते, ती निःस्वार्थी आहे आणि स्वतःशी नेहमीच प्रामाणिक राहते. झनकची भूमिका साकारणे हा माझ्याकरता एक शक्तिशाली अनुभव आहे आणि अजूनही मी दररोज नव्याने माझ्या या व्यक्तिरेखेचे नवनवे पदर शोधत आहे.”
उत्साहाने रिया म्हणाली, “ही मालिका म्हणजे माझ्याकरता आणि विशेष करून अरिजीतकरता एक नवी सुरुवात आहे, त्याच्यासोबत काम करणे हा माझ्याकरता रोमांचक अनुभव आहे”.
झनक या नवीन युगात पाऊल ठेवत असताना, पुढे उभ्या ठाकणाऱ्या लढायांना तोंड देण्यास तिच्यात पुरेशी ताकद असेल का? आणि या नव्या काळात कोणती रहस्ये उलगडली जातील?
मालिकेची पुढील रंगत वाढण्याकरता ‘झनक’ मालिकेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रेक्षकांना या मालिकेद्वारे नव्या दमाच्या कथाकथनाचा एक ताजातवाना अनुभव घेता येईल. भावभावनांचे हिंदोळे, वाढत जाणारी नाट्यमयता आणि मनातले बोलायला जराही न घाबरणारी धाडसी नायिका प्रेक्षकांना नव्या रूपातील ‘झनक’मध्ये पाहता येईल.
सोमवार ते रविवार, रात्रौ साडे दहा वाजता केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘झनक’ मालिका पाहायला विसरू नका.



