देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहर
Trending

हेमा मालिनीं : बप्पा हे कलाकारांसाठी ईश्वर आहेत

मुंबई ( हर्षदा वेदपाठक ) : बॉलीवूडची ड्रीमगर्ल, राज्यसभा खासदार आणि नृत्य-अभिनय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणजे, हेमा मालिनी. त्यांच्या घरी अनेक दशके बाप्पाचे आगमन होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपले मत करताना त्यांनी हर्षदा वेदपाठक यांना सांगितले की, “गणपती बाप्पा हे आमच्या कलाकारांसाठी आद्य दैवत आहेत. तेच आम्हाला शक्ती, प्रेरणा आणि आत्मविश्वास देतात,”.

हेमा मालिनी यांनी सांगितले की बाप्पाच्या कृपेनेच कलाकारांना रंगमंचावर आणि पडद्यावर उत्कृष्टतेने काम करण्याची प्रेरणा मिळते. त्या पुढे म्हणाल्या – “कलाकारांचे जीवन हे चढ-उतारांनी भरलेले असते. अशा वेळी बाप्पाचे आशीर्वादच आपल्याला कठीण काळात पुढे जाण्याची शक्ती देतात. आमच्या कलेत आणि सर्जनशीलतेत त्यांचे आशीर्वाद नेहमीच सामावलेले असतात.”

त्यांनी पुढे सांगितले की, कलाकारांसाठी बाप्पा हे केवळ देवता नसून मार्गदर्शक आणि प्रेरणेचा स्रोत आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही हेमा मालिनी यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करून कुटुंबासोबत विधिवत पूजा-अर्चा केली. त्या म्हणाल्या – “बाप्पाच्या कृपे शिवाय आमच्या कलेला काही अर्थ नाही. तेच आमची प्रेरणा आहेत, आमची शक्ती आहेत.”

हेमा मालिनी यांचे जीवन हे कला आणि समाजसेवेला समर्पित आहे. नृत्य, अभिनय आणि राजकारणात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांचा विश्वास आहे की बाप्पाची भक्ती आणि आशीर्वाद हेच त्यांच्या जीवन व करिअरचा पाया आहेत. यामुळेच कठीण काळात त्यांना स्थैर्य आणि धैर्य मिळाले.

हेमा मालिनींचा हा संदेश हे सिद्ध करतो की गणपती बाप्पा हे केवळ कलाकारांची प्रेरणा नाहीत, तर त्यांच्या कला आणि जीवनातील मार्गदर्शक शक्ती आहेत. बाप्पाची भक्ती आणि आशीर्वाद कलाकारांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची प्रेरणा देतात आणि समाजातील सर्जनशीलता व संस्कृती अधिक बळकट करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button