देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

अर्जुन बिजलानीने कुब्रा सैटचे केले कौतुक

मुंबई – असामान्य भूमिका आणि प्रभावी अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी कुब्रा सैट आता रिअ‍ॅलिटी टीव्हीच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. अशनीर ग्रोवर होस्ट करत असलेल्या राईज अँड फॉल या कार्यक्रमात ती सहभागी झाली आहे. या शोमध्ये स्पर्धकांना वास्तव जीवनातील संपत्ती आणि सत्तेतील असमानता दर्शवणाऱ्या कठीण आव्हानां मधून तपासलं जातं आणि त्यामध्ये कुब्रा ही सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक वाटते.

अलीकडच्या एका भागात अभिनेता अर्जुन बिजलानीने तिच्या कामगिरीचं कौतुक करताना म्हटलं,
“मला वाटतं तू खूप चांगली दिसते आहेस. थोडी कुकू (जुन्या जमान्यातील अभिनेत्री) सारखी दिसत आहेस. वागताना पण समजूतदार दिसते आहेस. तू हे खूप छान सांभाळलंस. तू खूप चांगलं काम केलं आहेस.”

रिअ‍ॅलिटी शोच्या पलीकडे, कुब्रा सतत आपला बहुपदरी अभिनयाचा पोर्टफोलिओ वाढवत आहे. अलीकडेच ती अजय देवगणच्या सोन ऑफ सरदार 2 या चित्रपटात झळकली आणि आता ती द ट्रायलच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या सत्रात ‘सना’च्या भूमिकेत परत येत आहे. यापूर्वी ती सुलतान आणि रेडी यांसारख्या चित्रपटांत देखील दिसली होती. परंतु नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्समधील ‘कुकू’ या भूमिकेने तिला इंडस्ट्रीती एक वेगळी आणि लक्षवेधी ओळख मिळवून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button