आर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रविशेष
Trending

व्यापार्‍यांशी जीएसटी विषयावर भाजपा नेते प्रेम शुक्ला यांचा संवाद,सरकारच्या सुधारणांना व्यापारी संघटनांची दाद


मुंबई – रिटेल अँड डिस्पेंसिंग केमिस्ट्स असोसिएशन व प्रॉमिनेंट ट्रेड ऑर्गनायझेशन या व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी विले पार्ले येथे शुक्रवारी संवाद साधला. अलीकडेच केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये दिलेल्या सूटबाबत त्यांनी व्यापाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी भाजपा मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व सिद्धिविनायक मंदिर समितीचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते. प्रतिनिधीमंडळात बकुलभाई ठक्कर, रुक्माकर शेनॉय, तुषार कतरेचा, निलेश गालिया यांसह अन्य पदाधिकारी व व्यापारी सहभागी झाले होते.


बैठकीत प्रेम शुक्ला यांनी सरकारकडून जाहीर झालेल्या जीएसटी दर कपातीचे थेट फायदे व्यापाऱ्यांना व सामान्य ग्राहकांना कसे मिळतील, याची माहिती दिली. “सरकारचा उद्देश छोट्या व्यापार्‍यांना दिलासा देण्याचा असून या निर्णयामुळे किरकोळ ग्राहकांनाही थेट फायदा होईल,” असे ते म्हणाले.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या या पावलाचे स्वागत केले आणि व्यापार क्षेत्रासाठी हा सकारात्मक निर्णय असल्याचे नमूद केले.
दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांच्या अनियमित कामकाजाबद्दल व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. “मोठ्या परदेशी कंपन्या नियमांचा भंग करून बेकायदेशीर मार्गाने बाजारावर वर्चस्व गाजवत आहेत. त्यामुळे लघु व किरकोळ व्यापारी गंभीर अडचणीत सापडले आहेत,” असे प्रतिनिधीमंडळाने सांगितले.
यावर उपाय म्हणून सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक संस्था स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली. “असे पाऊल उचलल्यास बाजारातील स्पर्धा संतुलित राहील व लघु व्यापार्‍यांचे हितसुरक्षण होईल,” असे मत व्यापाऱ्यांनी मांडले.


प्रेम शुक्ला यांनी व्यापाऱ्यांना दिलासा देत सर्व सूचना व मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. “भाजपा सरकार नेहमी छोट्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे ते म्हणाले.
रिटेल अँड डिस्पेंसिंग केमिस्ट्स असोसिएशन व प्रॉमिनेंट ट्रेड ऑर्गनायझेशन ही संस्था देशभरातील फार्मसी समुदायाचे प्रतिनिधित्व करते. 1945 साली स्थापन झालेली ही संस्था रिटेल केमिस्ट्सना भेडसावणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button