महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक
Trending

मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५: उद्योजकांसाठी व्यासपीठ

मुंबई – मराठा समाजातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणणारे ‘मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५’ हे भव्य व्यासपीठ यावर्षी २८ आणि २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील नेहरू सेंटर, वरळी येथे पार पडणार आहे. हा कार्यक्रम मराठा बिझनेसमन फोरम (MBF) तर्फे आयोजित करण्यात आला असून, दोन दिवस चालणाऱ्या या कॉन्क्लेव्हमध्ये व्यावसायिक प्रदर्शन, टॉक शो, सेमिनार, पुरस्कार सोहळा, नेटवर्किंग सत्र तसेच शासकीय सत्र असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


या भव्य कॉन्क्लेव्हमध्ये राज्यभरातील ५,००० पेक्षा अधिक उद्योजक, गुंतवणूकदार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
प्रमुख आकर्षणे
व्यावसायिक प्रदर्शन :
१०० पेक्षा अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटॅलिटी, सेवा, पर्यटन, आयटी, ऑटोमेशन, रिटेल यांसारख्या विविध क्षेत्रातील उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन होईल.
टॉक शो :
यशस्वी उद्योगपती आणि व्यावसायिक आपल्या यशोगाथा मांडत व्यवसाय वाढ, निधी उभारणी आणि मार्केटिंग या विषयांवर मार्गदर्शन करतील.
सेमिनार्स :
उद्योगतज्ज्ञांकडून नवीन तंत्रज्ञान, बदलते व्यवसाय ट्रेंड आणि गुंतवणुकीच्या संधींवर सखोल चर्चा होईल.
पुरस्कार सोहळा :
विविध क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजक आणि स्टार्टअप्सचा सन्मान करण्यात येणार आहे. हे पुरस्कार नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.
नेटवर्किंग सत्र :
उद्योजक, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांच्यात नव्या भागीदारी व व्यवसायिक संधींची निर्मिती होईल.
शासकीय सत्र :
शासकीय योजना, उद्योग साहाय्य व प्रोत्साहनपर योजना याबाबत थेट अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाईल.

कॉन्क्लेव्हचा उद्देश
या कॉन्क्लेव्हचा मुख्य हेतू म्हणजे मराठा उद्योजकांना नव्या व्यवसाय संकल्पना, नेटवर्किंग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे, तसेच समाजातील आर्थिक सक्षमीकरणाला गती देणे हा आहे. यामुळे नवउद्योजकांना रोजगारनिर्मिती आणि व्यवसाय विस्तारासाठी दिशा मिळणार आहे
कार्यक्रमाची माहिती
स्थळ: नेहरू सेंटर, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, लोटस कॉलनी, वरळी, मुंबई
दिनांक: २८ व २९ नोव्हेंबर २०२५
संपर्क: ९०४९० ०२७०२ / ८०८०२ ०३२९९ / ९८२३० ४०५४९ / ९९२२९ ३३४५६
एम.बी.एफ. कार्यालय: शिवनेरी हॉल, श्री शिवाजी मंदिर, एन.सी. केळकर मार्ग, दादर (प.), मुंबई
नोंदणी: QR कोड स्कॅन करून स्टॉल बुकिंग सुरू आहे
‘मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह २०२५ – नव्या संधींची नवी सुरुवात!’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button