देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेष
Trending

19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फ 2026 चा शुभारंभ

मुंबई –

संदर्भही त्यांनी मांडला. हा महोत्सव जगभरातील चित्रपट, विचार आणि चित्रपटकर्त्यांना एकत्र आणणारा महोत्सव आहे असे ते म्हणाले. अधिक सखोल दडलेले वास्तव शोधण्याचे धाडस करणाऱ्या आणि ते प्रभावीपणे सिनेमॅटिक मांडणीच्या माध्यमातून सादर करणाऱ्या चित्रपटकर्त्यांसाठी महत्त्वाचा मंच उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हा महोत्सव सातत्याने पार पाडत राहील असेही त्यांनी सांगितले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मिफ्फ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “भारतात सर्जन करा” ह्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते, असे माहिती प्रसारण सचिवांनी यावेळी सांगितले. या महोत्सवामुळे, ज्यांना वास्तवाचा शोध घेऊन, सिनेमाच्या माध्यमातून ते मांडायचे आहे, अशा धाडसी चित्रपट निर्मात्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. 

भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी जयदीप अहलावत यांचा गौरव

यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात अभिनेते जयदीप अहलावत यांचा गौरव केला गेला. हा या कार्यक्रमातील एक महत्वाचा क्षण ठरला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या सन्मानानासाठी अहलावत यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. अर्थपूर्ण कथात्मक मांडणीला अवकाश मिळवून देण्यात तसेच मुख्य प्रवाहातील मांडणीच्या पलीकडे जाऊन सिनेमॅटिक अभिव्यक्तिला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मिफ्फसारखे महोत्सव महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

उद्घाटनपर चित्रपटांमधील कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान

या सोहळ्यात महोत्सवाच्या उद्घाटनपर चित्रपटांच्या पडद्या मागील सर्जनशील चमूचा देखील गौरव करण्यात आला. ‘अगापितो’ (Agapito) हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लघुपट आणि ‘टाईम ॲण्ड वॉटर’ (Time & Water) या माहितीपटाच्या प्रतिनिधींचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला.

‘अगापितो’ (Agapito) मधील अभिनेता अँटोन नोलास्को आणि कास्टिंग डायरेक्टर मा. ख्रिस्तीना सायमन यांचा गौरव करण्यात आला. तसेच, प्रेक्षकांपर्यंत प्रभावी जागतिक कथानक पोहोचवल्याबद्दल ‘टाइम अँड वॉटर’ (Time & Water) शी संबंधित नॅशनल जिओग्राफिक आणि जिओस्टार (JioStar) च्या टीममधील सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.

परीक्षकांचा सत्कार

उद्घाटनाच्या आणखी एका भागात, महोत्सवातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक (ज्युरी), राष्ट्रीय स्पर्धा परीक्षक आणि ‘फिप्रेस्की’ (FIPRESCI) परीक्षकांचे औपचारिक स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

ज्युरी पॅनेलमध्ये भारत आणि जगभरातील चित्रपट निर्माते, समीक्षक, अभ्यासक, प्रोग्रॅमर आणि माध्यम व्यावसायिकांचा समावेश असून, त्यांच्यावर माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन चित्रपटांच्या वैविध्यपूर्ण निवडीचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उद्घाटन समारंभात भारताचा कलात्मक वारसा दर्शवणारा एक बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. या समारंभाला प्रख्यात चित्रपट निर्माते आणि इफ्फी 2026 चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, एनएफडीसीचे अध्यक्ष कृष्णकुमार जी, इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशन (आयडीपीए) चे अध्यक्ष संस्कार देसाई, मिफ्फ आणि एनएफडीसीचे महोत्सव संचालक प्रकाश मगदूम, उद्योग क्षेत्रातील धुरीण, चित्रपट निर्माते, ज्युरी सदस्य आणि भारतातील तसेच परदेशातील मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे दर दोन वर्षांनी आयोजित केला जाणारा आणि एनएफडीसीद्वारे अमलात आणला जाणारा यंदाचा सात दिवसांचा महोत्सव, चित्रपट निर्माते, चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमींना नक्कीच समृद्ध अनुभव देणारा ठरेल. यंदाच्या महोत्सवासाठी एकूण 1,459 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, 46 देशांच्या सुमारे 350 चित्रपटांची प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यामुळे मिफ्फ 2026, हा सर्वात भव्य महोत्सावांपैकी एक ठरेल. प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील प्रतिभेचा अविष्कार सादर करण्यासाठी आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी, यंदाच्या इफ्फी महोत्सवात, ‘मराठी चित्रपट’ (Marathi Films) आणि ‘ईशान्येकडील प्रतिध्वनी’ (Echoes from North East) हे दोन नवीन विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button