मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतर्गत महोत्सवाचे आयोजन

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १६ ते २० जून दरम्यान पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात नियमित संध्याकाळी ६.३० वाजता महोत्सव रंगणार आहे. केवळ १९ जून रोजी ४ ते ६ वाजेपर्यंत प्रदर्शन करण्यात येणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
माहितीपट व लघुपट वेळापत्रक खालील प्रमाणे : –
Tuesday, 16 June 2026
- मायबाचे आशिर्वाद- लघुपट
- मेतकूट – लघुपट
- नेहमीच – लघुपट
- फड- माहितीपट
Wednesday, 17June 2026
- वेणी – लघुपट
- जास्वंद- लघुपट
- पॅम्पलेट- लघुपट
- महाल्ले- माहितीपट
- अर्जुन- लघुपट
Thursday, 18 June 2026
ब्रह्मकमळ- लघुपट
गढूळ- लघुपट
डीयर २०२- लघुपट
१७ वे वर्ष- लघुपट
फड- माहितीपट
Friday, 19 June 2026
पाणखोल- लघुपट
अर्जुन- लघुपट
डोंगर पाणी-लघुपट
दारवठा‐लघुपट
Saturday, 20 June 2026
वाघ-लघुपट
सापशिडी- लघुपट
मुक्ता- लघुपट
दारवठा- लघुपट



