मनोरंजनमहाराष्ट्र

प्रा. वामन केंद्रे यांची निशुल्क “मॅजिक ॲाफ ॲक्टींग” ही कार्यशाळा २७,२८,२९ जून रोजी !!!

मुंबई – रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट- मुंबईच्या वतिने आयोजित, तीन दिवस चालणारी, आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व भारतातील एक सर्वोत्तम नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक, एन. एस. डी. चे माजी संचालक व बहुप्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री ने सन्मानित प्रा.वामन केंद्रे यांच्या “मॅजिक ॲाफ ॲक्टींग ” अर्थात “अभिनयची जादु” या विषयावरील कार्यशाळेचे व मोफत “अभिनय करिअर मार्गदर्शन सेमिनार” चे आयोजन येत्या शनिवार, रविवार व सोमवार दिनांक २७,२८,२९ जून रोजी २०२६ या दिवशी राजर्षी शाहु सभागृह, दादर येथे ८ व ९ नोहंबर सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.सदर कार्यशाळा ही १५ ते ७० वर्ष या वयोगटातील कलांवतांसाठी असणार आहे.
प्रा. वामन केंद्रे यांचं अभिनय व नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान हे अमूल्य व बेजोड आहे. त्यांच्याकडे शिकलेले आणि नावारूपाला आलेले शेकडों कलावंत आज नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, रेडिओ, नाट्य-चित्रपट शिक्षण इत्यादी माध्यमात केवळ अग्रेसर नाहीत तर देशात-विदेशात दबदबा निर्माण करून कार्यरत आहेत.
आत्तापर्यंत केंद्रे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर , मॉरीशस इत्यादी देशांबरोबरच भारतभर ४५० च्यावर कार्यशाळा घेवुन राष्ट्रीय आंतरीष्ट्रीय दर्जाचे कलाकार घडवले आहेत.

प्रा. वामन केंद्रे यांना आत्तापर्यंत सात राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. ज्या मध्ये संगीत नाटक अकादमी दिल्ली पुरस्कार , राष्ट्रीय कालीदास सन्मान( मध्य प्रदेश ) ब. व. कारंत पुरस्कार, मनोहर सींग स्मृती पुरस्कार( एन.एस.डी), राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान(उज्जैन) रमेश सींग राष्ट्रीय सन्मान( पटना ) व पद्मश्री पुरस्कार ( भारत सरकार) सामील आहेत.

या कार्यशाळेत अभिनयाची जादु काय असते, या क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी काय करावे लागते तसेच अभिनयाचे प्रकार, अभिनयाच्या शैली, भुमिकेचा अभ्यास, संभाषण म्हणजे काय? त्याचे मुळ व्याकरण, प्रभावी संभाषण ची तत्वे कोणती या विषयीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. नाटक,चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, वेब सिरिज, रेडिओ, व्हाईस ओव्हर आदि माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार मार्गदर्शनही केले जाईल.

ही कार्यशाळा निःशुल्क असुन या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व अभिनय व आवाज या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या कलावंतानी सदर कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी 7039475537/ 98211 23260 या नंबरवर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे अथवा rangpeeththeatremumbai@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन रंगपीठ थिएटर मुंबईच्या अध्यक्षा सौ. गौरी केंद्रे यांनी व श्री. छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button