मनोरंजनमहाराष्ट्रविशेष

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५ मध्ये महाराष्ट्रातील पाच कर्तबगार भगिनींचा सन्मान

मुंबई – महिलांना संधी मिळाली पाहिजे. लाडक्या बहिणीसाठी चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही… कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज महिलांचा गौरव करत आहोत हे सांगतानाच महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले आहे. आम्ही पण अनेक महिलांना संधी देण्याचे काम करत आहोत हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी अजितदादा पवार यांनी ज्या महिलांचा सन्मान केला त्यांच्याविषयी कौतुकास्पद इत्यंभूत माहिती यावेळी दिली.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभ्या केल्या व या राज्याला सुसंस्कृत राजकारण दिले त्यांचा वारसा घेऊन काम करत असल्याचेही अजितदादा पवार यावेळी म्हणाले.

अनेक महिलांचे कर्तुत्व राज्याने पाहिले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावे मनभेद होता कामा नये असे सांगतानाच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात ज्यांनी योगदान दिले त्यांचा उद्या गौरव करणार असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.

तुम्हाला सन्मानित करताना आम्हाला अभिमान आहेच शिवाय तुमच्या पुरस्काराने आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कौतुक केले.

तुम्ही महाराष्ट्राचे नाव मराठी संस्कृतीची एक जगभरात ओळख निर्माण केली आहात. मात्र राजकारण्यांची ओळख कलाकार म्हणून केली जाते कारण सकाळ, दुपार, संध्याकाळी आमच्या भूमिका वेगवेगळ्या असतात परंतु तुम्ही कलाकार आपल्या अभिनयाने त्या भूमिका दाखवून देत आहात त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी कलाकारांचे कौतुक केले.

महाराष्ट्र महोत्सव-२०२५ च्या दुसर्‍या दिवशी मध्ये आज महाराष्ट्रातील पाच कर्तबगार भगिनींचा ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये देश व राज्यपातळीवर महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

याशिवाय राज्यसभेच्या तालिका सभापती म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल खासदार सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला.

फार मोठा गौरव आज माझा करण्यात आला. हा पुरस्कार पत्रकारितेसाठी सुरू ठेवला त्याबद्दल राही भिडे यांनी धन्यवाद दिले.

कष्टकरी, कामगार महिलांना दादांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. दादा आपण मनात आणले तर मुख्यमंत्री व्हाल पण ५० टक्के महिला आरक्षण लक्षात घेता महिला मुख्यमंत्री राज्याला मिळावा अशी मागणीही राही भिडे यांनी केली.

सर्वच क्षेत्रात महिला आज पुढे गेल्या आहेत. आपल्यासमोर परिस्थिती येईपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही असे सांगतानाच मी अनवाणी पायांनी खेळाकडे वळल्याचे धावपटू ललिता बाबर यांनी सांगितले. ललिता बाबरसारख्या अनेक खेळाडू महाराष्ट्रातून मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकांनी आपल्याकडून आशेने व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत. या क्षेत्रात चांगले काम करायला हवे असेही सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.

दादा आमचा तुम्हाला आमचा अभिमान वाटेल असे काम करु अशी ग्वाही सोनाली कुलकर्णी यांनी दिली.

हा माझा सन्मान मानत नाही यामागे अनेकांचा त्याग आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार मानतानाच जडणघडण ही आईवडील आणि गुरूंनी घडवली आहे.यांच्या बळावर २५ वर्षाचा टप्पा गाठला असल्याचे बेला शेंडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी फोल्क आख्यान पार पडले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुनेत्रा पवार, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button