मनोरंजनमहाराष्ट्रविशेष

सारा अली खान ए वतन मेरे वतन द्वारे सगळ्यांना देणार धक्का

हर्षदा वेदपाठक

मुंबई – देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेकांनी लहान मोठ्या प्रमाणात बलिदान दिले आहे. काहींची नोंद इतिहासात आहे तर अनेकांची नोंद इतिहासात नाही. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळावं, ब्रिटिशांच्या जोखडातून भारत देश स्वतंत्र व्हावा, यासाठी वय आणि जात यांचं कोणतेही बंधन न जुमानता, अनेक भारतीय नागरिकांनी देशासाठी बलिदान दिले. त्याची इतिहासामध्ये काही ठिकाणी नोंद झाली आहे तर, काही ठिकाणी नोंदच नाहीये. अशाच काही कथानकांना आपण आता पडद्यावर पाहणार आहोत. अशीच एक कथा आहे ए वतन मेरे वतन.

कानन अय्यर दिग्दर्शित ए वतन मेरे वतन या चित्रपटामध्ये वास्तवदर्शी घटनांचा आधार घेऊन गुंतलेले कथानक आहे. या चित्रपटामध्ये सारा अली खान, सचिन खेडेकर अभय वर्मा, स्पर्शी श्रीवास्तव,अलेक्स ओ नील, आनंद तिवारी यांच्या प्रमुख भूमिका असून इमरान हाश्मी हा पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत दिसून येईल.

आतापर्यंत आपण सारा हिला अनेक ग्लॅमरस आणि शहरी भूमिकेत पाहिले आहे. परंतु ए वतन मेरे वतन मध्ये डीग्लॅम भूमिकेत दिसून येईल. इतकेच नव्हे तर एका तरुण स्वातंत्र्यसेनानीची भूमिका तिने अविश्वसनीयरित्या उत्तम निभावली आहे. साराच्या चाहतांना तिला या अवतारात पाहून नक्कीच धक्का बसणार आहे. परंतु साराचे मागचे अनेक चित्रपट पाहता ती पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत दिसून येईल. साराचा चाहता वर्ग हा तरुण असल्याचे दिसून येते. परंतु ए वतन मेरे वतन पाहून तिचे फॅन्स, आपल्या आवडत्या अभिनेत्रीला एका चांगल्या, दमदार भूमिकेत बघून नक्कीच आनंद होईल यात शंका नाही. ए वतन मेरे वतन हा चित्रपट 21 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button