महाराष्ट्रशहर

दंगल टीव्हीवर नवी मालिका मिलके भी हम ना मिले

हर्षदा वेदपाठक

मुंबई – मिलके भी हम ना मिले – नर्मदेच्या नयनरम्य खोऱ्यांपासून ते जबलपूरच्या व्यस्त शहरापर्यंतची एक अभंग प्रेमकथा आहे. हि कथा जी कौटुंबिक धारणा, न्याय, प्रेम, विश्वासघात आणि बरेच काही यावर प्रश्न विचारते. कारण रेवा (दीक्षा धामी) तिचा भूतकाळ शोधते आणि श्रुतीचा (मनिषा सक्सेना) वास्तविक हेतू जाणून घेते

दंगल टीवी ने ‘मिलके भी हम ना मिले’ हा पॉवर-पॅक, आकर्षक, नाटकीयपणे नशीब, प्रेम आणि गूढतेच्या पार्श्वभूमीवर वेगळेपणा देणारा आगळा कौटुंबिक शो लाँच केला आहे. हा शो स्वातंत्र्याची ताकद आणि शो त्यातील पात्रांसह सर्व दर्शकांना बांधून ठेवणारे अतूट नाते यांचा मनोरंजकपणे शोध घेतो. या मिलिकेद्वरा प्रेक्षक भेटू शकतात, आकर्षक पात्रांच्या कलाकारांशी, ज्यांचे जीवन अनपेक्षित मार्गांनी एकमेकांना छेदतात

कथेच्या केंद्रस्थानी आहे श्रुती आणि विभोर (जोहैब सिद्दीकी) हे एक तरुण जोडपे. जे त्यांच्या लग्नासाठी आशीर्वाद मागतात. जेव्हा श्रुतीचे जीवन फेऱ्यात अडकते तेव्हा नशिब नाट्यमय वळण घेते. त्या दरम्यान एक रहस्यमय तारणहार उदयास येतो – रेवा.


जसजसे श्रुती तिच्या बचावकर्त्याच्या जवळ जावू लागते, त्यांचे एक बंधन तयार होवू लागते. रेवाचा भूतकाळ समोर येऊ लागतो, गुपिते आणि लपलेले सत्य यासह. प्रत्येक घटनेसह नातेसंबंधांचे जटिल जाळे अधिक गुंतागुंतीचे होवून जाते. ज्यामुळे भावना आणि निष्ठा यांचा एक संघर्ष होतो.

रेवा, मुक्ती आणि आत्म-शोधाच्या प्रवासाला सुरुवात करते, तिने विभोरपासून एक जीवन बदलणारे रहस्य लपवून ठेवले असते, ज्या कारणामुळे तिने अनपेक्षित परिस्थितीत लग्न केले असते.

मिल्के भी हम ना मिले हि मालिका प्रेक्षकांसमोर आणताना आनंद होत असल्याचे, निर्माते सोहन मास्टर आणि विशाल बिसेन (टोनी) सांगतात.

“मुख्यतः, माझा ठाम विश्वास आहे की ही कथा प्रत्येकासाठी आहे, ती केवळ प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करणार नाही तर प्रत्येक वयोगटाशी संबंधित असेल. अशी संकल्पना रचली गेली आहे की ती दर्शकांच्या भावनिक नाडीला अचूकपणे जाणवेल. रेवाच्या प्रवासातून दर्शक स्वार्थावर निस्वार्थीपणाचा विजय आणि प्रतिकूलतेवर चांगल्याचा अंतिम विजय पाहतील”, सोहन मास्तर आणि विशाल बिसेन पुढे सांगतात, “गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवांतून आणि विविध मानवी जीवनशैली आणि भावनांचा अभ्यास करून, आम्हाला ही कथा तयार करण्याची कल्पना संयुक्तपणे सुचली. आम्ही निःसंशयपणे असे म्हणू शकतो की हा शो लोकांना त्यांच्या अंतर्मनाच्या जवळ आणेल, कोणत्या ना कोणत्या प्रकारे.


रहस्ये उलगडत असताना, नियतीची टक्कर होत असताना, प्रेक्षक अशा जगात गुंतले जातील जिथे प्रत्येक निर्णयाचे महत्त्व आहे. आणि प्रत्येक दृश्य नवीन वळण घेऊन येतो. तर दर्शको…प्रेम, विश्वासघात आणि नियतीच्या हृदयात अविस्मरणीय प्रवासासाठी सज्ज व्हा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button