हिवाळ्यातील स्वादिष्ट मिष्टान्ने: कलाकारांच्या आवडत्या स्नॅक्सबाबत जाणून घ्या!

हर्षदा वेदपाठक, मुंबई
हिवाळा सुरू झाला असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे, ज्यामुळे सर्वांना प्रवास करण्यासह आपल्या आवडत्या हंगामी मिष्टान्नांचा आस्वाद घ्यावासा वाटत आहे. एण्ड टीव्ही कलाकार हिवाळ्यातील त्यांच्या आवडत्या स्नॅक्सबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत आशुतोष कुलकर्णी (कृष्णा बिहारी वाजपेयी, ‘अटल’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘अटल’मधील आशुतोष कुलकर्णी ऊर्फ कृष्णा बिहारी वाजपेयी म्हणाले, ”पुणे किंवा मुंबईतील हिवाळा ऋतू मला खूप आनंदित करतो. तसेच हिवाळा ऋतू नेहमी मला खूप उत्साहित करतो. संपूर्ण प्रदेशामध्ये पसरलेला थंडावा खूप आल्हाददायी असतो. मी गरमागरम वडापाव आणि भजीचा आस्वाद घेतो. तसेच गरमारगम कांदापोहे किंवा साबुदाणा वडा सोबत चहाचा आस्वाद मला खूप आवडतो. आम्हा पुणेकरांच्या मनात फूडला महत्त्वाचे स्थान आहे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आम्हाला अविश्वसनीय भोजनालयांचा शोध घ्यायला आवडते. फक्त हिवाळ्यातच नाही तर मी प्रत्येक ऋतूमध्ये माझे आवडते मिसळ पाव आणि थालीपीठचा मनसोक्त आस्वाद घेतो, पण हिवाळा यामध्ये अधिक स्वादासह उत्साहाची भर करतो.”

मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”मला हिवाळा ऋतू खूप आवडतो, कारण मला माझ्या आवडत्या खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घ्यायला मिळतो. मुंबईतील रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर स्टॉल्स आहेत, जेथे बटाटे, कांदे व चण्याच्या पीठापासून बनवले जाणारे कुरकुरीत बटाटे वडे आणि भजीचा आस्वाद घ्यायला मिळतो आणि हे या ऋतूदरम्यान माझे आवडते स्नॅक आहे. पावासोबत बटाटे व भजी खाताना अद्वितीय आस्वादाचा अनुभव मिळतो. मी या स्टॉल्सच्या बाजूने जात असताना बटाटे वडे आणि भजीचा नक्की आस्वाद घेतो. माझे मूळगाव उत्तरप्रदेशमध्ये मी टमाटर व पालक चाट, समोसे म्हणून ओळखले जाणारे सिंघाडा, सोबत दिली जाणारी तिखट चिंचेची चटणी यांचा आस्वाद नक्की घेतो. इतर हंगामी मिष्टान्ने जसे ताज्या हिरव्या मटारपासून बनवले जाणारे चुरा मटार, पोहा, निमोना (हिरव्या वाटण्याचा रस्सा) आणि गाजरचा हलवा हे मला खूप आवडतात.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”हिवाळ्यादरम्यान माझे आवडते मिष्टान्न म्हणजे गाजरचा हलवा. मी नेहमी हिवाळ्यादरम्यान गाजरच्या हलव्याचा आस्वाद घेते. घरी असताना मी सुकामेव्यासह स्वादिष्ट मिष्टाने तयार करते. हिवाळ्यादरम्यान चांगले गाजर बाजारात येतात, ज्यामुळे मी संपूर्ण वर्ष हिवाळ्याची वाट पाहत असते. इंदौरकर असल्यामुळे मला गजक व गराडू आवडतात, ज्यांचा मी हिवाळ्यादरम्यान मनसोक्त आस्वाद घ्यायची. गराडू हे अद्वितीय स्नॅक आहे, जे फक्त मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये पाहायला मिळते. हिवाळ्यातील ही अविश्वसनीय ट्रीट आहे, ज्यामध्ये गरम व तिखट मसाल्यांसह तळलेले गराडू क्यूब्स असतात, त्यावर कोथिंबीर टाकण्यासह लिंबाचा रस टाकला जातो. मी इंदौरमध्ये गेल्यास गराडूचा आस्वाद नक्की घेते. सर्वांना स्वादिष्ट मिष्टान्नांनी भरलेल्या आल्हाददायी हिवाळ्याच्या शुभेच्छा!”




