म्हाडा लॅाटरीत डबेवाल्यांना १०% आरक्षण द्या – सुभाष तळेकर

मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली की महाराष्ट्र शासनाच्या वतिने डबेवाला कामगार यांना घरे उपलब्द करून दिली जातील …
डबेवाला कामगार हा प्रामुख्याने MMRDA च्या परिक्षेत्रात रहातो मग तो विरार, कल्याण, नवि मुंबई, वसई, ठाणे, डोंबीवली, बोरीवली. घाटकोपर, अंधेरी येथे प्रामुख्याने रहातो जर महाराष्ट्र शासनाने डबेवाला कामगाराला कल्याणला घर उपलब्द करून दिले तर विरार, बोरीवली, अंधेरी येथील डबेवाला कामगार याला ते गैरसोईचे होणार आहे तर विरार येथे महाराष्ट्र शासनाने घर उपलब्द करून दिले तर ठाणे, डोंबिवली, घाटकोपर येथील डबेवाला कामगारांना ते गैरसोईचे होणार.. त्या पेक्षा सरकारला आमची विनंती आहे म्हाडाच्या वतिने जेथे जेथे घरे बांधली जातील त्या मध्ये १०% आरक्षंण डबेवाला कामगारांना द्यावे या मुळे डबेवाला कामगाराला काम करतो त्या रेल्वे लाईन वर घर उपलब्द होऊ शकते.. उदा बोरीवली, विरार येथे म्हाडा घरे बांधत असेल तर पश्चिम रेल्वे वर काम करणाऱ्या डबेवाला कामगार यांना ते सोईचे होईल… कल्याण,ठाणे येथे म्हाडा घरे बांधत असतील तर मध्यरेल्वे वर काम करणाऱ्या डबेवाला कामगार यांना ते सोईचे होईल… नवि मुंबई येथे म्हाडा घरे बांधत असतील तर हार्बर रेल्वे वर काम करणाऱ्या डबेवाला कामगार यांना ते सोईचे होईल तेव्हा सरकारला “ मुंबई डबेवाला असोशिएशन” ची विनंती आहे की म्हाडाच्या वतिने जी नविन घरे बांधण्यात येतील त्या मध्ये १०% आरक्षण डबेवाला कामगार यांना द्यावे या मुळे डबेवाला कामगाराला आपण काम करतो त्या रेल्वे लाईन वर त्याला घर मिळेल ते त्याच्या सोईचे असेल…



