
मुंबई (स्पेशल स्टोरी बाय – हर्षदा वेदपाठक ) – झी स्टुडिओज, उमेश के.आर. बंसल आणि प्रेरणा अरोरा निर्मित बहुप्रतीक्षित ‘जटाधरा’ या चित्रपटातील ‘शोभा’ या भूमिकेत अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिचा पहिला लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली नसल्यास नवल.

“तंत्रामध्ये परिवर्तित होऊन गेलेला लोभ” ही ओळ शिल्पा शिरोडकर साकारत असलेल्या दमदार आणि रहस्यमय भूमिकेची झलक दाखवते.
या चित्रपटाबद्दल शिल्पा सांगते, “जटाधरा’चा भाग होणे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण हा चित्रपट प्रेक्षकांना आगळ्या आणि रहस्यमय सफरीवर घेऊन जाईल. माझी भूमिका ‘शोभा’ ही शक्तिशाली, गुंतागुंतीची आणि रहस्यमय आहे. ती जिवंत करण्यासाठी मी पूर्ण मन आणि आत्मा गुंतवलाय. हा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
झी स्टुडिओज आणि प्रेरणा अरोरा यांनी ‘जटाधरा’ ला भव्य आणि आकर्षक बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. दमदार कलाकार, अप्रतिम दृश्ये आणि प्रभावी कथा यामुळे हा चित्रपट चर्चेत असलेल्या रिलीजपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाचे निर्माते उमेश कुमार बंसल, शिविन नारंग, अरुणा अग्रवाल, प्रेरणा अरोरा, शिल्पा सिंघल आणि निखिल नंदा आहेत. तर अक्षय केजरीवाल आणि कुस्सुम अरोरा सहनिर्माते आहेत. दिव्या विजय या क्रिएटिव्ह प्रोड्यूसर असून भविनी गोस्वामी सुपरवायझिंग प्रोड्यूसर आहेत. संगीत झी म्युझिक कंपनीकडून प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून ठरली नाही. मात्र, लवकरच ट्रेलर आणि इतर अपडेट्स प्रेक्षकांसमोर येणार आहेत.



