देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

महावतार युनिव्हर्स’ची भव्य घोषणा

मुंबई – भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित ७ भव्य चित्रपटांची मालिका – होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांची महत्त्वाकांक्षी अ‍ॅनिमेटेड फ्रँचायझ

होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी अ‍ॅनिमेटेड फ्रँचायझ – महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्सची अधिकृत घोषणा केली आहे. भारताच्या प्राचीन अध्यात्मिक परंपरेवर आधारित ही अ‍ॅनिमेटेड मालिका भगवान विष्णूंच्या दशावतारांवर केंद्रित असेल. पुढील एक दशकभर ही चित्रपटमालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, याची सुरुवात महावतार नरसिंह या चित्रपटाने २०२५ मध्ये होणार आहे आणि समाप्ती महावतार कल्कि – भाग २ या चित्रपटाने २०३७ मध्ये होईल.

अधिकृत रिलीज कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे:

★ महावतार नरसिंह – २०२५
★ महावतार परशुराम– २०२७
★ महावतार रघुनंदन– २०२९
★ महावतार द्वारकाधीश– २०३१
★ महावतार गोकुलानंद – २०३३
★ महावतार कल्कि – भाग १ – २०३५
★ महावतार कल्कि – भाग २ – २०३७

महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स केवळ चित्रपटांपुरते मर्यादित न राहता – कॉमिक्स, डिजिटल कथा, व्हिडीओ गेम्स आणि विशेष संग्रहणीय वस्तूंच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करून देण्यात येईल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भारताच्या अध्यात्मिक वारशाशी नव्याने जोडण्यासाठी एक व्यापक भावविश्व तयार करण्यात येणार आहे – जे आजच्या पिढीलाही आवडेल आणि आपली परंपरा नव्या पद्धतीने सादर करेल.

‘महावतार नरसिंह’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन कुमार करत असून, क्लीम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. होम्बले फिल्म्स यांच्यासोबतच्या सहकार्याने हा चित्रपट एक भव्य दृश्य अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संस्कृतीची गूढता, दमदार व्हिज्युअल्स, भावस्पर्शी कथा आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्यांसह हा चित्रपट ५ भारतीय भाषांमध्ये आणि ३D फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होईल.

‘महावतार नरसिंह’ ही केवळ एक फिल्म नाही, तर ती आजच्या पिढीला आपल्या प्राचीन संस्कृतीशी जोडणारी एक जिवंत अनुभूती असेल. या चित्रपटाचे प्रदर्शन २५ जुलै २०२५ ला होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button