लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनावेळी ‘गणेश उत्सव’ चित्र पोस्टकार्ड संचाचे प्रकाशन

मुंबई – लालबाग चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रविवारी आयोजित प्रथम दर्शन सोहळ्यात महाराष्ट्र पोस्टल सर्कलकडून विशेष प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी “गणेश उत्सव : महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा” या विषयावर आधारित चार चित्र पोस्टकार्डांचा संच आणि विशेष कैंसलेशन प्रकाशित केले.

या चित्र पोस्टकार्डांचे डिझाइन पद्मश्री पुरस्कार विजेते प्रसिद्ध अक्षरकला तज्ज्ञ अच्युत पालव यांनी केले असून ते या प्रकाशनावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाला लालबाग चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब सुदाम कांबळे, सचिव सुधीर सीताराम साळवी, डॉ. सुधीर जाखेरे (सहाय्यक पोस्टमास्टर जनरल- व्यवसाय विकास, महाराष्ट्र सर्कल), यादगिरी न्यालपेल्ली (सहा. निदेशक- पीएसआर, महाराष्ट्र सर्कल) आणि फिलाटलिस्ट अश्विनी मंजुरे उपस्थित होते.
यावेळी मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व गणेशभक्त तसेच तिकिट संग्राहकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.



