देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

मन्नू क्या करेगा चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – आता मनात रुंजी न घालणाऱ्या गाण्यांना जा विसरून. कारण बॉलिवूडचा रोमान्स आता एका नव्या संकल्पनेसह आला आहे. मन्नू क्या करेगा? या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि यात ते सर्व आहे जे आपण एका क्लासिक बॉलिवूड चित्रपटामध्ये शोधतो. खास करून खिळवून ठेवणारी केमिस्ट्री, भावनात्मकता, मनाला धुंद करणारे संगीत जे ट्रेलर संपल्यानंतरही मनात गुंजत राहते.

क्युरियस आयज सिनेमाच्या बॅनर अंतर्गत शरद मेहरा निर्मित आणि संजय त्रिपाठी दिग्दर्शित या चित्रपटात, व्योम आणि साची बिंद्रा हे दोन नवीन कलाकार दिसणार आहेत. या दोन नव कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे. यांच्यासोबत विनय पाठक, कुमुद मिश्रा आणि चारू शंकर हे सहकलाकार देखील आहेत.

ट्रेलर पाहताना सुरवातीपासूनच चित्रपटामध्ये तजेला आणि रंगत जाणवते. व्योम आणि साचीची फ्रेश केमिस्ट्री भुरळ घालणारी आहे. हे दोन्ही कलाकार नवीन असून सुद्धा त्यांचा आत्मविश्वास त्यांना सहजता देतो. ते पाहताना, जुने चित्रपट आठवले नाही तर नवल.

मन्नू क्या करेगा? मध्ये रोमान्ससोबत कौटुंबिक ड्रामा, भावनिक चढउतार आणि पहिल्या प्रेमाची गोड संवेदना सुंदररीत्या दाखवली आहे.

मन्नू क्या करेगा? ची आणखीन एक खासियत म्हणजे, त्याचे संगीत. ट्रेलरमध्ये झळकणारे, मनाला भिडणारे “हमनवा” हे गाणे निश्चित लक्षात राहते. इतकेच नव्हे तर या चित्रपटाची सगळीच गाणी, २०२५ च्या रोमान्टिक म्युझिक लिस्ट मध्ये झळकत आहेत. चित्रपटाच्या टीझरने केवळ श्रवणीयतेची झलक दिलीया. तर ट्रेलरने हा चित्रपट प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये सामील होणार याची ग्वाही दिलीय.

मन्नू क्या करेगा चा ट्रेलर रोमान्सच्या प्रत्येक रंगाची झलक दाखवतो — मग ती मस्ती असो, ड्रामा असो, हृदयभंगाची वेदना असो किंवा स्वतःला शोधण्याचा आनंद असो. नवे चेहरे, गहिरे भाव आणि उदित नारायण, शान, मालिनी अवस्थी यांनी गायलेल्या संगीताची जादू यामुळे हा चित्रपट २०२५ मधील सर्वात मोठ्या मस्ट-वॉच चित्रपटांपैकी एक होणार असे दिसते.

तर मंडळी तयार रहा. पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मन्नू क्या करेगा? या चित्रपटाला पाहून, प्रेमात पडण्यासाठी आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button