हर्षदा वेदपाठक,पणजी, गोवा
54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑफ इंडिया (IFFI) मध्ये प्रतिष्ठित ICFT – UNESCO गांधी पदकासाठी नामांकन मिळवलेले आणि स्पर्धांमध्ये सहभाग असलेले जगभरातील दहा विविध चित्रपट; महोत्सवाच्या ठिकाणी प्रदर्शित केले जात आहेत. ICFT-UNESCO गांधी पदक श्रेणीमध्ये UNESCO ने मान्यता दिलेल्या महात्मा गांधींच्या कालातीत आदर्शांचा समावेश असून त्यांतून, गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रतिध्वनी उमटलेला आहे तसेच एकोपा, समजूतदारपणा आणि शांतता रुजलेल्या विश्वाचे समर्थ चित्रण केले आहे.
विशेष करून संघर्ष आणि अराजकतेने वेढलेल्या या जगात शांतता, सहिष्णुता, अहिंसा आणि करुणा या तत्त्वांप्रती आपली चेतना पुनर्प्रस्थापित करणारे उत्कृष्ट चित्रपट या, स्पर्धेसाठी निवडलेले गेले असून या चित्रपटांतून ते दीपस्तंभासारखे दिसून येत आहेत.
या वर्षी, जगातील विविध कोनाकोपऱ्यातून आलेल्या या पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुढील दहा उल्लेखनीय चित्रपटांत स्पर्धा होणार आहे:
1. मुयाद अलायान यांचा – ‘ए हाउस इन जेरुसलेम’, (पॅलेस्टाईन, यूके, जर्मनी, नेदरलँड, कतार, 2022),2. टिनाटिन कज्रिश्विली यांचा ‘सिटिझन सेंट’ (जॉर्जिया, 2023) ,3. अँथनी चेन यांचा ‘ड्रिफ्ट’ (यूके, फ्रान्स, ग्रीस, 2023),4. अपोलिन ट्रओरे यांचा “इट्स सिरा” (फ्रान्स, जर्मनी, सेनेगल, 2023) ,5. ओव्ह मस्टिंग यांचा ‘कालेव्ह’ (एस्टोनिया, 2022) ,6. पॉल फौजान अगुस्ता यांचा ‘द प्राइज’(इंडोनेशिया, 2022),7. जॉन टॉर्नब्लॅड यांचा ‘द शुगर एक्सपेरिमेंट’ (स्वीडन, 2022) ,8. राकेश चतुर्वेदी ओम यांचा ‘मंडली’ (भारत, 2023) ,9. विष्णू शशी शंकर यांचा ‘मलिकापुरम’ (भारत, 2022) ,10. सायंतन घोसन यांच्या ‘रवींद्र काव्य रहस्य’ (भारत, 2023)