मागूर मासा संवर्धन करणाऱ्यांवर धडक कारवाई
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
मत्स्यव्यवसाय विभागाची इंद्रायणी नदी काठी संवर्धन होत असलेल्या प्रतिबंधित मागूर मासा या पर्यावरणाला व मनुष्याला घातक असलेल्या मागुर मासा संवर्धन करणार्यांवर धडक कारवाई मत्सविभागाकडुन करण्यात अली आहे.
प्रतिबंधित मागूर मासा संवर्धन केला जात असल्याची तक्रार मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाघमारे यांनी केली होती.
आळंदी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील कोयाळी तर्फे चाकण येथील इंद्रायणी नदी काठी प्रतिबंधित मागूर / थाई जातीच्या ( _Clarias gariepinus_ ) मासळीचे संवर्धन होत असल्याबाबतची माहिती मुंबई चे पत्रकार श्री प्रशांत वि वाघमारे यानी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, श्रीमती. अर्चना धि. शिंदे मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांना दिली
सदर बाबत सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी , जुन्नर कार्यालयाचे अधिकारी, किरण मा. वाघमारे यांनी संवर्धन होत असलेल्या जागे बाबत शाहनिशा केली व पुणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय,अर्चना धि. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 12/06/2024 रोजी राजगुरूनगर तालुक्याचे अधिभारीत अधिकारी .किरण मा. वाघमारे तसेच पुणे कार्यालयातील अधिकारी . भि.श. पाटील, . रा. रु. राठोड व जाधव यांनी कोयाळी तर्फे चाकण या गावातील . महादू गेनूभाऊ कोळेकर याचे अंदाजित ४००० किलो तर . गोरक्ष अंबर पोकळे यांचे तलवातील ५००० किलो असे एकूण ९००० किलो (9 मे. टन ) तर बापू तात्या कोळेकर व बाळासाहेब तात्या कोळेकर याचे तलावातील प्रत्येकी 1 टन असे एकून 11 मे.टन प्रतिबंधित मागूर मासे नष्ट करून मासळी मासळी संवर्धकांवर वर पोलीस स्टेशन आळंदी येथे कायदेशीर FIR गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाघमारे म्हणाले की मागुर मासा हा मनुष्याच्या आरोग्यास अत्यंत घातक व हानिकारक असुन त्याच्या सेवनामुळे कर्करोगासारखे आजार झाल्याच्या घटना आहेत. तसेच पाण्यातील जलजीवांचा नाश या मागुर माशामुळे होतो. तसेच जलजीवांवर हल्लाकरुन ते खाल्लयामुळे ते पाण्यात नष्ट होत आहेत त्यामुळे निसर्गाचा समतोल नष्ट होत असल्यामुळे या माशाच्या संवर्धनावर कठोर निर्बंध आहेत. पण आर्थिक लाभापोटी काही लोकांकडून मत्सपालनाच्या नावाखाली शेततळे करुन पालन केले जात आहे. ते अत्यंत घातक असल्यामुळेच मत्सविभागाने यावर कारवाईचा बडगा उगारला हवा अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार कारवाई झाली आहेत.
सदर कार्यवाही करिता पोलीस स्टेशन आळंदीचे पोलीस निरक्षक भिमा नरके व पोलीस कर्मचारी डिकळे व श्रीमती. गायकवाड यांनी सहकार्य केले.