देश-विदेशमनोरंजनविशेष

इफ्फीच्या उद्घाटन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांचा करण्यात आला सत्कार

गोवा ( पणजी ) विशेष प्रतिनिधी – चित्रपट उद्योगातील बहुप्रशंसित  व्यक्तिमत्त्व आणि उत्साही सिने-रसिकांच्या उपस्थितीत, गोव्याच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी  55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) चा प्रारंभ झाल्याचे घोषित करण्यात आले.  भारताचा  सांस्कृतिक समन्वय आणि विविधतेचे दर्शन  घडवणाऱ्या बहुरंगी  सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि सर्जनशीलता, सिनेमॅटिक प्रतिभा  आणि चलचित्रपटांच्या माध्यमातून  कथाकथनाची कला साजरी करण्याच्या नऊ दिवसांच्या महोत्सवाची दिमाखात  सुरुवात झाली.जगभरातील चित्रपटप्रेमींची  प्रदीर्घ प्रतीक्षेची, 55 व्या इफ्फीच्या   सुरुवात ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी यांच्या ‘बेटर मॅन’ या  चित्रपटाने सांगता  झाली.

सिनेप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य उद्घाटन समारंभात सिनेविश्वातील काही दिग्गजांचा सत्कार करण्यात आला . या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर या लोकप्रिय कलाकारांनी केले. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज सुभाष घई, चिदानंद नाईक, बोमन इराणी, आर के सेल्वामणी, जयदीप अहलावत, जयम रवी, ईशारी गणेश, आर. सरथ कुमार, प्रणिता सुभाष, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग, रणदीप हुडा आणि नित्या मेनन यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात  आले.

भारतीय परंपरेनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नारळाच्या रोपाला पाणी घालून चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले; यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे;  माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; महोत्सवाचे संचालक शेखर कपूर; सीबीएफसीचे अध्यक्ष  प्रसून जोशी; आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष  नवनीत कुमार सहगल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

होबम, उषा देशपांडे, वंदना कोहली, मिथुनचंद्र चौधरी आणि शालिनी शाह यांचा समावेश आहे.

इफ्फीच्या उदघाटनपर सोहळ्यात ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ अर्थात उद्याचे सर्जनशील कलावंत या उपक्रमाविषयी देखील घोषणा करण्यात आली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या  55व्या आवृत्तीत ‘युवा चित्रपटनिर्माते’ – “भविष्य इथेच आहे” या संकल्पनेवर आधारित उदयोन्मुख प्रतिभावंत युवा चित्रपटनिर्मात्यांच्या क्षमतेला वाव दिला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button