पत्रकार अमृत सुतार यांना सत्यमेव सेवा फाउंडेशनकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान
मुंबई – विविध क्षेत्रात म्हणजे शिक्षण, कृषी, अध्यात्म, सेवा आणि आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्याना सत्यमेव सेवा फाउंडेशनतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याहीवर्षी राज्यस्तरीय सत्यमेव सेवा सन्मान सोहळा रविवार दी 08 – 12 – 2024 रोजी बाळ दंडवते स्मृती सभागृह लोअर परेल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. सत्यमेव सेवा फौंडेशनच्या पुरस्काराचे मानकरी पुढीप्रमाणे…
श्री.दिलीप जेठे(सेवा रत्न )
श्री. रामकृष्ण परब(समाज प्रबोधन)
सौ. उषाताई डांगले (वारकरी भूषण)
श्री. अमृत सुतार (उत्कृष्ट पत्रकारिता )
श्री. सूर्यकांत आंगणे(काव्य भूषण )
सौ.वर्षा येवले(क्रीडा रत्न )
श्री. संतोष डावरे (युवा उद्योजक)
श्री.आनंदा अस्वले (कवी रत्न )
श्री.दीपेश मेहता (समाज भूषण )
श्री. पुरुषोत्तम गेडाम(आदर्श शिक्षक )
इत्यादी समाज रत्नांना पुरस्कार जाहीर झाले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका डॉ.सुशीला नाईक, शिवसेना विधानपरिषद आमदार श्री.सुनिल शिंदे ,सहयाद्री प्रतिष्ठान अध्यक्ष श्री.सुरेश खवरे, मनसे शाखा प्रमुख श्री.मारुती दळवी, शिवसेना शाखा प्रमुख श्री सचिन नरेवाडे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्वच पुरस्कार प्राप्त हिऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व केलेल्या सन्मानाचे समाधान व्यक्त केले. सर्व पाहुण्यांनी फाउंडेशनचे कौतुक व स्तुती करताना आम्ही अशा निःस्वार्थ कार्य करणाऱ्या फाउंडेशनच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आलो हे आमचे भाग्य आहे असं मत व्यक्त केलं. कारण आजकल रंगीं ढोंगी सेवा पाहायला मिळते. पण इथे येऊन चांगल्या लोकांच्या संगतीत आल्याचे समाधान मिळाल्याची कबुली दिली.
या दिमाखदार सोहळ्यात फाउंडेशनचे संस्थापक सुनिल बोरनाक, अध्यक्ष संदीप मेंगाणे,उपाध्यक्ष सतीश पाटील,सचिव अविनाश लोंढे, खजिनदार रामचंद्र भोसले, प्रदेश प्रवक्ते अक्षय भोसले,रायगड जिल्हा संघटक विनोद वारके, माणगाव तालुका अध्यक्ष केशव मोरे, विनोद येसादे,सर्जेराव मटकर,दीपक बोरनाक, रामचंद्र बुगडे व इतर पदाधिकारी वर्ग इत्यादी उपस्थित होते.