मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी केले स्मार्ट टिफिन उपक्रमाचे उद्घाटन.

मुंबई ( प्रतिनिधी ) – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण शिखर परिषदचे मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिखर परिषदेच्या पहिलाच सत्रात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या महिलांचा निवडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या परिषदेत प्रामुख्याने पत्रकारिता, योगाभ्यास, लेखन, चित्रपट परीक्षण आणि लाइफ कोचिंगसह विविध क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव युनायटेड गेट वन या संस्थेतर्फे करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून या समयी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये, आरती शर्मा यांना योगाभ्यास आणि स्पिरिच्युअल अवेकनिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. भावना शर्मा या लेखिका असून त्यांचे हिंदी पत्रकारिते मध्ये अविरत कार्य आहे.
रोझमिन अत्तर यांना तरुण पिढीमध्ये योगाभसाची आवड निर्माण व्हावी यासाठी घेतलेला पुढाकाराबद्दल पुरस्कृत करण्यात आले.
हर्षदा वेदपाठक या प्रशिक्षित सिने पत्रकार असून त्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी तसेच गुजराती भाषेत पत्रकारिता केली आहे. त्यांनी सिनेमावर लिहिलेला पुस्तकास राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. सोबतच त्या सिने पत्रकारितेचे प्रशिक्षण घेऊन नवीन पिढीला पत्रकारितेची नीती आणि मूल्य शिकवण्यावर भर देतात. रिसर्च आणि अवांतर लेखनामध्ये देखील त्यांचा हातखंडा आहे. इतर पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये श्रीमती अंशुमन, वैशाली उमराजकर, डॉ. मेराज ए. पठाण यांचा समावेश होता.

युनायटेड गेट वनचे संचालक सचिन कटारनवरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. सोबत मिड डे या नियतकालिकाचे बिझनेस हेड राहुल शुक्ला, डॉ. अमजद खान पठाण, गणपत कोठारी यांनी या असाधारण महिलांना सन्मानपत्रे प्रदान केली.

“स्मार्ट टिफिन” या योजनेचा शुभारंभ देखील याच कार्यक्रमात करण्यात आला. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील दहा हजार महिलांना लघु उद्योगाद्वारे सक्षम करण्याचा मानस युनायटेड गेट वन चे अध्यक्ष सचिन कटारनवरे यांनी व्यक्त केला.

पुढे त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेची बांधिलकी व्यक्त केली. महिलांच्या कर्तृत्वाला मान्यता देऊन आणि “स्मार्ट टिफिन” सारखे उपक्रम सुरू करून, युनायटेड गेट वन महिलांसाठी अधिक समावेशक आणि सहाय्यक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करत राहील असे आश्वासन यावेळी दिले.
या योजनेच्या शुभारंभ अमृता फडणवीस यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अमृता फडणवीस यांनी उपस्थित सर्व महिलांचे अभिनंदन करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान, डॉक्टर अमजद खान पठाण यांनी महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या चिंतेवर भाष्य केले तसेच त्यांच्या उपचार पद्धतींवर प्रकाश टाकला. तर रोझमिन अत्तर यांनी योग अभ्यासाचे महत्व यावर आपले विचार व्यक्त केले.



