मनोरंजनमहाराष्ट्रविशेष

आमच्या धर्मावरच प्रश्न का? : मिराय अभिनेता तेजा सज्जा

मुंबई – आगामी पॅन-इंडिया स्पेक्टेकल मिराय च्या भव्य कार्यक्रमात अभिनेता तेजा सज्जा यांना विचारले गेले की, त्यांच्या चित्रपटांमध्ये धार्मिक घटक वारंवार का दिसून येतात? त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले,

“जेव्हा तीच प्रेमकथा वारंवार पडद्यावर आणली जाते तेव्हा कुणी प्रश्न का विचारत नाही. पण आपण आपल्या धर्मातून प्रेरणा घेऊन काही सांगायचा प्रयत्न केला की लोक शंका घेतात. आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे—ही आपली भूमी आहे, आपले संस्कार आहेत. ट्रेलरच्या ३ मिनिट १० सेकंदांमध्ये फक्त १० सेकंद भगवान रामांची झलक दाखवली आहे आणि त्यावरूनच धर्मावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा चित्रपट फक्त त्याच्याबद्दल नाही तर ही फँटसी, अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर, सुपरहिरो स्टोरीटेलिंग आणि गहन भावना यांचा संगम आहे. आम्ही हे सगळं भारतीय इतिहासाच्या दृष्टीकोनातून नवीन आणि आकर्षक पद्धतीने सादर करत आहोत, जेणेकरून नवीन पिढी त्या विषयाबरोबर जोडली जाईल आणि ते विचार, संस्कार आत्मसात करू शकतात.”

इतिहास आणि धमाकेदार अ‍ॅक्शन यांचा मेळ घालणारा मिराय प्रेक्षकांना कधीही न अनुभवलेला सिनेमॅटिक अनुभव देईल, असे निर्मात्यांनी यावेळी सांगितले. मनोज मंजू, जगपति बाबू, जयराम, श्रिया सरन आणि रितिका नायक यांसारख्याl दमदार कलाकारांनी सजलेला हा चित्रपट आहे. गौरा हरी यांच्या स्वमधुर संगीताने आणि व्हिज्युअल्समुळे अधिक प्रभावी ठरणारे आहे.

तेजा सज्जा यांचे स्क्रीन प्रेझेन्स, कार्तिक घट्टमनेनी यांची व्हिजनरी स्टोरीटेलिंग आणि धर्मा प्रोडक्शन्सचा उत्तर भारतीय बाजारपेठेत असलेला मजबूत पाठिंबा यांच्या जोरावर ‘मिराया’ हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी जगभर प्रदर्शित होईल. सिनेमाचा पायंडा आणि परिभाषा नव्या उंचीवर नेण्याचे वचन हा चित्रपट देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button