मुंबई – नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल (नरेडको), महाराष्ट्रा तर्फे भारतातील सर्वांत मोठ्या रियल इस्टेट प्रॉपर्टी एक्स्पो च्या तिसर्या पर्वाचे- ‘ होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२४’ या प्रदर्शनाचे आयोजन ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे करण्यात येत असून आता हे प्रदर्शन हरीत प्रदर्शन बनणार आहे.
होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ चे औचित्य साधून नरेडको महाराष्ट्र कडून आता त्यांच्या ‘शाश्वत आणि पर्यावरणस्नेही भविष्यातील गृहनिर्माण’ उपक्रमासाठी उद्घाटनाच्या सत्रात दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सहकार्य करारावर (एमओयू) हस्ताक्षर करण्यात येणार आहे. आपल्या नोंदणीच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक घरखरेदीदारांनी आपले घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत नोंदणी करणार्यांची ही संख्या जवळजवळ दुप्पट आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून नरेडको महाराष्ट्रा ने फिनिक्स फाऊन्डेशन संस्था या प्रसिध्द कृषीतज्ञ आणि पर्यावरणाशी सुसंगत पीक म्हणून बांबूचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणारे श्री पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखालील संस्थे बरोबर भागीदारी केली आहे. श्री पाशा पटेल हे महाराष्ट्र कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष असून ते महाराष्ट्र सरकार द्वारा स्थापित अटल बांबू समृध्दी योजनेच्या टास्क फोर्स चे ही अध्यक्ष आहेत.
या भागीदारी मुळे नरेडको महाराष्ट्र कडून पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनानुसार विकासकांमध्ये बांबू चा वापर करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यात येणार असून यामुळे बांधकाम प्रकल्पातील पर्यावरणस्नेही पर्याय म्हणून उपयोग करुन भविष्यातील घरे निर्माण करण्यासह शाश्वत उपक्रमांचा वापर करुन पर्यावरणा विषयी विचार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमा विषयी बोलतांना नरेडको चे उपाध्यक्ष श्री. राजन बांदेलकर यांनी सांगितले “नरेडको महाराष्ट्र ने नेहमीच सक्षम शाश्वत पध्दतींच्या निर्मितीवर लक्ष्य केंद्रित केले आणि घरखरेदीदार आणि विकासक यांच्यातील दुवा म्हणून आम्ही पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करण्यावर भर देत आहोत. एक अनोखे पाऊल म्हणून या वर्षीच्या होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो मध्ये भविष्यातील शाश्वत हाऊसिंग देण्यावर विशेष लक्ष देत आहोत. बांबूचा वापर वाढवण्यासह पर्यावरणस्नेही सामानाचा वापर करत पर्यावरणस्नेही कामांमुळे राज्याच्या नेट झिरो उपक्रमाला आम्ही सहकार्य करुन देशाच्या पातळीवर आम्ही नेऊ.”
होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो विषयी माहिती देतांना नरेडको महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री प्रशांत शर्मा यांनी सांगितले “घरखरेदीदारांमध्ये आम्ही खूपच उत्साह पहात आहोत त्यामुळे घरांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसते. होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ मध्ये आंम्हाला आशा आहे की घरांची अधिक प्रमाणात विक्री होईल. या वर्षीच्या एक्स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे मोठी सूट आणि दसर्यासाठी विशेष ऑफर्स विकासक आणि गृहकर्ज कंपन्यांकडून आणण्यात येत आहेत, ज्यामुळे खरेदीदारांसाठी उत्तम संधी मिळेल व ते त्यांचे स्वप्नातील घर योग्य मुल्यात घेऊ शकतील. मी इच्छूक खरेदीदारांना हा लाभ घेऊन होमेथॉन एक्स्पो २०२४ मध्ये असलेल्या डील्सचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत करतो. यावर्षीचे होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो हे हरीत होत आहे, यामुळे ग्राहकांना हरीत अनुभव मिळून पर्यावरणस्नेही गृहप्रकल्प प्राप्त होऊ शकतील.”
पाशा पटेल यांनी सांगितले “ राज्यातील वातावरण बदलाशी मुकाबला करत असतांना रिअल इस्टेट क्षेत्र हे मोठे योगदान देत असते, कारण ते बांबू सारख्या वस्तूंचा उपयोग हा बांधकाम प्रकल्पांमध्ये परंपरागत गोष्टींच्या ऐवजी करु शकतात ज्यामुळे वातावरणावर सकारात्मक परिणाम होऊन तापमानाच्या समस्येवर उपाय केला जाऊ शकेल. एक व्यावसायिक संस्थे व्यतिरिक्त शहरातील बांबू लागवड कार्यक्रमाची सुचना बीएमसी कडून करण्यात आली असून हे उपक्रम हे एमएमआर आणि राज्यातील अन्य शहरातही करणे आवश्यक आहे.”
हरीत उपक्रमांच्या व्यतिरिक्त होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ मध्ये आता अनोखा उपक्रमही दिसून येणार आहे. एका अनोख्या उपक्रमा अंतर्गत आता रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासासाठी इंजिनियरींग, बांधकाम तंत्रज्ञान पासून मार्केटिंग पर्यंत, अर्थपुरवठ्यापासून ते विक्री पर्यंत आता या एक्स्पो मध्ये विविध करियरच्या पर्यायां विषयी चर्चा होईल त्यामुळे इच्छूकांना करियर विषयीही मार्गदर्शन होणार आहे. एमएमआर मधील ‘पुर्नविकास’ क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच विकासक आणि गृहनिर्माण संस्था यांच्या विश्वास निर्माण करण्यासाठी तज्ञ या विषयावर चर्चा करुन एमएमआर क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थेतील महत्त्वपूर्ण घटकांबरोबर चर्चा करुन पुर्नविकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करतील.
होमेथॉन एक्स्पो २०२४ चा प्रसार हा बॉलिवूड मधील प्रसिध्द जोडी रितेश आणि जिनिलिया देशमुख करत असून यामध्ये १००० हून अधिक असे महाराष्ट्रातील प्रतिशयश व्यावसायिकां चे प्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. हे प्रकल्प परवडणार्या घरांसह लक्झरी विभागात असून त्यांची किंमत रु १९ लाखांपासून ते रु ९ कोटींपर्यंतचे आहेत. या प्रदर्शनात काही सवलती जसे नो स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस सह प्रतिशय वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज योजना सुध्दा सादर करण्यात येणार आहेत. या एक्स्पो मध्ये मुंबई आणि एमएमआर सह ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, रायगड, मिरारोड, वसई, विरार इत्यादी सह पुणे, नाशिक आणि नागपूर येथील प्रकल्पही उपलब्ध आहेत.