घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार पटकावला
मुंबई –
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये नवज्योत बांदिवडेकर ‘घरत गणपती’ या त्यांच्या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार बांदिवडेकर यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा प्रभाव अधोरेखित करतो आणि त्यांना चित्रपट उद्योगातील एक नव्या दमाचा प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून पाहतो.
भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने यंदाच्या इफ्फी आवृत्तीसाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नव्याने सुरू केला आहे.
प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपये रोख, असे स्वरूप असलेला हा पुरस्कार इफ्फीच्या समारोप सोहळ्यात नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रभावीरित्या मांडलेल्या कथेसाठी प्रदान करण्यात आला.परंपरेला आणि आधुनिक संवेदनांना जोडणारी हृदयस्पर्शी कथा सादर करण्याच्या क्षमतेबद्दल परीक्षकांनी बांदिवडेकर यांची दिग्दर्शक म्हणून प्रतिभा दाखवल्याबद्दल प्रशंसा केली
बांदिवडेकरांनी कौटुंबिक बंधांची गुंतागुंत मोठ्या खुबीने टिपली आहे. उत्कट भावनिक नादमयता कायम राखताना कौटुंबिक जीवनातील बारकावे उत्तमरीत्या अधोरेखित केले आहेत, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चित्रपटाची भट्टी उत्तम जमली आहे,” अशा शब्दांत ज्युरींनी त्यांचे कौतुक केले