कामाख्या देवीच्या दर्शनाकरता मी आतुर- खुशी दुबे

मुंबई – “जादू तेरी नजर- डायन का मौसम या मालिकेसह नव्या रोमांचक प्रवासाला सुरुवात करताना मी गुवाहाटीतील कामाख्या मंदिराला भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहे”, अशा शब्दांत ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या मालिकेतील खुशी दुबे ऊर्फ गौरी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या

नाविन्यपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या वेधक मालिकांकरता नावाजलेल्या ‘स्टार प्लस’ वाहिनीने ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या आगळ्यावेगळ्या मालिकेद्वारे पुन्हा एकदा आपले स्थान मनोरंजन वाहिन्यांमध्ये बळकट केले आहे. ही मालिका जादू, गूढता आणि दैव या संदर्भातील एक रंजक कथा आहे, जिथे दोन प्रमुख पात्रांचे जीवन अनपेक्षित पद्धतीने परस्परांशी जोडले जाते. विहानची भूमिका निभावणारा झेन इबाद खान, दावंश असून, खुशी दुबेने रीववंशी कुळातील गौरीची भूमिका साकारली आहे. तिच्या गूढ शक्तींनी, वाईट शक्तींशी लढणारी गौरी शक्तीचा आणि धैर्याचा दिवा ठरते. एकत्रितपणे, विहान आणि गौरी गूढ आणि जादूई दुनियेत मार्गक्रमण करणार आहेत.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या मालिकेत गौरीची शक्तिशाली भूमिका खुशी दुबेने जिवंत केली आहे. या मालिकेतील खुशीची गौरी ही व्यक्तिरेखा दैवी शक्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. वास्तव जीवनात, या अभिनेत्रीचा कामाख्या देवीवर दृढ विश्वास आहे आणि ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ ही तिची गूढ मालिका सुरू होण्यापूर्वी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेण्याची तिची मनोकामना होती. या मालिकेच्या गूढ जगात पाऊल ठेवताच, खुशीला कृतज्ञतेच्या भावनेपोटी कामाख्या देवीचा आशीर्वाद घ्यायचा होता. भारतातील सर्वात पुरातन आणि महत्त्वाच्या शक्तीपीठांपैकी एक असलेले कामाख्या मंदिर हे स्थापत्य वैभव आणि आध्यात्मिक महत्त्वाकरता प्रसिद्ध आहे. असे हे मंदिर खुशीला दैवी मार्गदर्शन मिळविण्याकरता एक परिपूर्ण ठिकाण आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘जादू तेरी नजर- डायन का मौसम’ या मालिकेतील खुशी दुबे ऊर्फ गौरी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाली, “जादू तेरी नजर- डायन का मौसम या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानते आणि त्याकरता मी कृतज्ञ आहे. वास्तविक जीवनात, मी देवी कामाख्या देवीची एक समर्पित अनुयायी आहे, जी दैवी स्त्री शक्ती आणि सामर्थ्याचे मूलतत्त्व आहे. ‘जादू तेरी नजर- दयान का मौसम’ या मालिकेतून या रोमांचक नव्या प्रवासाला प्रारंभ करताना मी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात जाऊन तिचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहे. या मालिकेची कथा जादूई आहे आणि कथानकाप्रमाणेच, कामाख्याच्या दैवी मंदिराला भेट दिल्यानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातही तीच जादू अनुभवायला आवडेल. दुर्दैवाने, माझ्या शूटिंगच्या वेळापत्रकामुळे, मी कामाख्या मंदिराला भेट देऊ शकले नाही. मात्र, कामाख्या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे आणि या नव्या उपक्रमाकरता देवीकडून आशीर्वाद घेण्याहून अधिक चांगला मार्ग कोणता असू शकतो?”