पत्रकार राजू झनके : बातम्यांपलीकडचं एक जिवंत उदाहरण

विशेष प्रतिनिधी मुंबई – पत्रकारिता म्हणजे केवळ घडामोडी दाखवणं नाही, तर समाजात परिवर्तन घडवण्याची शक्ती बनणं होय. हीच भावना मनात बाळगून पत्रकार राजू झनके यांनी आपला व्यवसाय समाजसेवेत रुपांतरित केला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शालेय उपयोगी वस्तू गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शाळेची पिशवी, वह्या, पेन, कपडे अशा छोट्या पण अत्यावश्यक वस्तूंचं संकलन करून त्या थेट गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.

पूराने घरं उद्ध्वस्त झाली, पण शिक्षणाचं स्वप्न थांबू नये, या भावनेने झनके यांचं हे कार्य सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नातून हे सिद्ध होतं की, संवेदनशील पत्रकार केवळ समाजाचं आरसं नसतो, तर समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ असतो. त्यांनी दाखवून दिलं आहे की, मदत मोठी असो वा लहान, ती मनापासून केली तर तीच खरी समाजसेवा ठरते.

राजू झनके यांच्या या कार्याला केवळ सलाम नव्हे, तर प्रेरणास्त्रोत मानायला हवं. अशा पत्रकारांमुळेच समाजात आशेचा किरण उजळतो, आणि पत्रकारिता पुन्हा एकदा “लोकांच्या सेवेसाठीचं व्यासपीठ” म्हणून उजळून दिसते.



