महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
Trending

2 ते 11 डिसेंबर दरम्यान प्रकल्पांविषयी माहिती व अर्ज नोंदणीकरिता सहाय्य करण्यासाठी २९ ठिकाणी स्टॉल्सची उभारणी

मुंबई (हर्षदा वेदपाठक ) – म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांच्या विक्रीत वाढ व्हावी व या गृहनिर्माण प्रकल्पांतील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व ऑनलाइन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शनासाठी दि. ०२ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली.

  • श्रीमती गायकर म्हणाल्या की, मंडळातर्फे राबविल्या जाणार्‍या या मोहिमेअंतर्गत म्हाडा कोंकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve) या तत्त्वावरील विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देणे व https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी २९ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर मंडळाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीपत्रक वाटप व पथनाट्य सादरीकरण केले जात आहे.
  • म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील सदनिकांच्या ऑनलाइन विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला ११ ऑक्टोबर २०२४ पासून प्रारंभ झाला आहे.
  • श्रीमती गायकर म्हणाल्या की, वसई विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर या महानगरपालिकांच्या कार्यालयात सदर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच पालघर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांत व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातही मंडळातर्फे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. वसई, उल्हासनगर, पालघर, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात सदर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महापे एमआयडीसी मधील प्रशासकीय अधिकारी कार्यालयातही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
  • विरार येथील जीवदानी देवी मंदिर, विरार चर्च, वसई चर्च या गर्दीच्या ठिकाणी तसेच विरार रेल्वे स्थानक, वसई, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वाशी, पनवेल, डोंबिवली, कर्जत, कल्याण या रेल्वे स्थानकांवरही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले असल्याचे श्रीमती गायकर यांनी सांगितले. या मोहिमेचा भाग म्हणून १० रिक्षांमधून प्रकल्पांची माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात म्हाडाच्या विक्रीविना पडून असलेल्या सदनिका विक्रीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या सूचनेनुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर मोहीम या त्याचा भाग आहे. या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. वानखडे यांनी केले.
  • म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी म्हणाले की, या सर्व प्रकल्पांमध्ये २४ तास पाणीपुरवठा, अग्निशमन यंत्रणा, लिफ्ट व कॉमन पॅसेज आहेत. सर्व वसाहतीमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उपलब्ध आहे.

काय असणार स्टॉल्सवर

या प्रत्येक स्टॉलवर मंडळाचा एक कर्मचारी असणार आहे. सदर कर्मचाऱ्यामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेतील म्हाडा कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांची संपूर्ण माहिती, योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती, ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याबाबत माहिती व सहाय्य, अर्ज नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रांबद्दल माहिती तात्काळ दिली जात आहे. अर्ज नोंदणी करतेवेळी येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरणही संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. सदर अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वयाकरिता म्हाडा कार्यालयात एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांचा तपशील
विरार बोळींज – १७४ (पीएमवाय)
विरार बोळींज – ४१६४
खोणी-कल्याण – २६२१ (पीएमवाय)
शिरढोण-कल्याण- ५७७४ (पीएमवाय)
गोठेघर-ठाणे- ७०१ (पीएमवाय)

भंडार्ली-ठाणे- ६१३ (पीएमवाय)

एकूण – १४,०४७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button