गेटवे ऑफ इंडियाच्या शताब्दीनिमित्त विशेष कैंसलेशन आणि चित्र पोस्टकार्ड जारी
मुंबई –
महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी आज गेटवे ऑफ इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त एका स्मरणार्थ विशेष कैंसलेशन आणि चित्र पोस्टकार्डचे अनावरण केले. हा कार्यक्रम महाराष्ट्र सर्किल कार्यालयात, भारतातील सर्वात महत्त्वाच्या वास्तूंपैकी एका वास्तू कडे लक्ष वेधून आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व साजरे करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मनोज कुमार, संचालक मेल आणि व्यवसाय विकास, अभिजीत बनसोडे, संचालक मुख्यालय, डॉ. सुधीर जाखेरे, सहाय्यक पोस्टमास्टर जनरल (व्यवसाय विकास) आणि यादगिरी न्यालपेल्ली, सहाय्यक संचालक डाकसेवा, महाराष्ट्र सर्कल हे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
1911 मध्ये किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधलेले गेटवे ऑफ इंडिया, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि इतिहासाचे प्रतीक आहे. या विशेष कैंसलेशन आणि चित्र पोस्टकार्डचा उद्देश त्या 100 वर्षांच्या वारशाचा सन्मान करणे, स्मारकाची भव्यता आणि स्थापत्य सौंदर्य प्रदर्शित करणे असा आहे.
गेटवे ऑफ इंडियाची शताब्दी साजरी करण्यासाठी डिझाइन केलेले विशेष कैंसलेशन आणि या राष्ट्रीय खजिन्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची झलक देणारे गेटवे ऑफ इंडियाचे चित्रण करणारे सुंदर पोस्टकार्ड मुंबई फिलाटेली ब्युरो येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते फिलाटेलिस्ट, इतिहासकार आणि भारताच्या वारशामध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक अशी कलेक्टरची वस्तू असेल.
या कार्यक्रमात बोलताना, श्री अमिताभ सिंह यांनी भारताचा इतिहास जतन करण्याच्या महत्त्वावर भर दिला.”हे प्रकाशन म्हणजे केवळ गेटवे ऑफ इंडियाच्या शताब्दीचा उत्सव नाही तर आपल्या देशाच्या इतिहासाशी संलग्न होण्याची आणि व्यापक प्रेक्षकांसोबत शेअर करण्याची संधी आहे,” असे ते म्हणाले.
या विशेष वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई जी.पी.ओ. फिलाटेली ब्युरो हे एकमेव ठिकाण असेल, ज्याची भारतातील आणि परदेशातील संग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाण्याची अपेक्षा आहे.