मुंबई. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती सरकारच्या वतीने भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी पाचच्या दरम्यान ग्रँड शपथविधी सोहळा आझाद मैदान येथे पार पडणार आहे.
तत्पूर्वी सकाळी ११:०० वाजता माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्या अगोदर श्रीसिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले त्याप्रसंगी न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर ( राज्यमंत्री दर्जा ) व आचार्य पवन त्रिपाठी – कोषाध्यक्ष यांनी श्रींची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले त्यावेळी न्यासाचे विश्वस्त भास्कर शेट्टी, जितेंद्र राऊत, महेश मुदलियार, सुदर्शन सांगळे उपस्थित होते.